ना ढोल... ना ताशा.. ना डीजे; विघ्नहर्त्याचे विसर्जन यंदा नियमांच्या चौकटीत

समीर सुर्वे
Tuesday, 1 September 2020

कोविडच्या पार्श्‍वभुमीवर यंदा महानगर पालिकेने गणपती विसर्जनासाठी नियमावली तयार केली असून यात विसर्जन मिरवणुक काढण्यास मनाई केली आहे

मुंबई : कोविडच्या पार्श्‍वभुमीवर यंदा महानगर पालिकेने गणपती विसर्जनासाठी नियमावली तयार केली असून यात विसर्जन मिरवणुक काढण्यास मनाई केली आहे.त्याच बरोबर सार्वजनिक गणपती विसर्जनाला जास्तीत जास्त 10 आणि घरगुती विसर्जनाला 5 पेक्षा जास्त भाविकांनी उपस्थीत राहाण्यास मनाई करण्यात आली आहे.या नियमांच्या चौकटीतच मंगळवारी (ता.1)अनंत चतुर्थीला विघ्नहत्यार्च विसर्जन होणार आहे.

ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा; विद्यार्थ्यांची घरातूनच परीक्षा? : परीक्षेचा निर्णय उद्या 

मुंबईत दरवर्षी अनंत चतुर्थीला 25-26 तास विसर्जन सोहळा रंगलेला असतो.लालबाग परळ पासून थेट गिरगाव चौपाटी पर्यंत रस्त्याच्या दुतर्फात भाविकांची गर्दी जमलेली असते.ठिक ठिकाणी मानाच्या गणेश मुर्तींवर नेत्रदिपक पुष्पवृष्टी केली जाते.मात्र,यंदा हे सोहळे होणार नाहीत.लालबागच्या राजाची यंदा प्रतिष्टापना करण्यात आलेली नाही.तर,मुंबईचा राजा म्हणून प्रतिष्टा असलेल्या गणेश गल्लीच्या गणेशमुर्तीची विसर्जनही साध्या पध्दतीने होईल.दरवर्षी गणेश गल्लीतील गणपती मुर्तीची मुरवणुक सुरु होते.गिरगाव चौपाटीवर या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर गिरणगावतील इतर सार्वजनिक मंडळाच्या मुर्तीचे विसर्जन होण्यास सुरवात होते.

मुंबईत गेल्या वर्षी 13 हजारच्या आसपास सार्वजनिक गणेशमुर्ती आणि 1 लाख 80 हजाराच्या आसपास घरगुती मुर्तींचे प्रतिष्टापना झाली होती.मात्र,यंदा हे प्रमाणही कमी झाले आहे.

'वांद्रे पश्चिम परिसरातील अमली पदार्थ आणि ड्रग्ज, पब आणि पार्टी' कल्चरवर कारवाई करा; भाजपनेत्याचे आयुक्तांना पत्र

हे लक्षात ठेवा
- घरगुती मुर्तीचे शक्‍यता घरातच विसर्जन करावे
- समुद्र किनारे,तलाव अशा नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जन करता येणार नाही.
- मुर्ती महानगर पालिकेला दान करायची आहे.
- फक्त 1 ते दिड किलोमिटर परीसरातील मुर्ती नैसर्गिक स्थळावर आणता येणार.
- प्रतिबंधीत क्षेत्र सिल इमारतींमधील सार्वजनिक आणि घरगुती मुर्तीचे विसर्जन त्याच ठिकाणी करावे

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No drums no Tasha no DJ Disruption of disruptors within the framework of rules this year