esakal | टि्वट का डिलीट केलं जातं याची कल्पना नाही- देवेंद्र फडणवीस

बोलून बातमी शोधा

देवेंद्र-आदित्य
टि्वट का डिलीट केलं जातं याची कल्पना नाही- देवेंद्र फडणवीस
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मोफत लसीकरणाबद्दल मंत्र्यांकडून वेगवेगळी विधाने केली जात आहेत. त्यानंतर टि्वट डिलीट केले जाते, हे असं का घडतं? त्याची आपल्याला कल्पना नाही असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते अंधेरी येथे कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका केली.

येत्या १ मे पासून १८ ते ४५ वयोगटासाठी लसीकरणाचा नवीन टप्पा सुरु होतोय. काल नवाब मलिक यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा मोफत लसीकरणाबद्दलचे टि्वट केले होते. पण नंतर त्यांनी ते टि्वट डिलीट केले. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये श्रेयासाठी चढाओढ आणि संभ्रम असल्याचा संदेश गेला.

हेही वाचा: "आपल्याला झेपतील आणि समजतील अशीच ट्विट करा"

मोफत लसीकरणाबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मूळात 'मन की बात' कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक पात्र व्यक्तीला केंद्र सरकार मोफत लस देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यांवर लसीकरणाचा भार नाहीय. पण एखाद्या राज्याला वेगाने लसीकरण करायचे असेल, तर बाजारातून लसी विकत घेण्याचा पर्याय खुला आहे." महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता दिसली पाहिजे असे फडणवीस म्हणाले.

"लसीकरणाची रणनिती आपल्याला ठरवावी लागेल. मोठ्य प्रमाणावर जनसमूह त्यामध्ये येणार आहे. गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरणाची रणनिती ठरवावी लागेल" असे फडणवीस यांनी सांगितले.