शरद पवारांच्या निवासस्थानी आज बैठक, शिवसेनेला निमंत्रण नाही

‘राष्ट्र मंच’ या नावाखाली राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींची बैठक
शरद पवार-उद्धव ठाकरे
शरद पवार-उद्धव ठाकरे

- विहिंग ठाकूर

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (ncp supremo) शरद पवार (sharad pawar) यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी आज राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींची बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि ‘राष्ट्र मंच’ या नावाखाली राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींची बैठक होणार असल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘राष्ट्र मंच’ हा वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा (yashwant sinha) यांचे व्यासपीठ असून त्यांच्या पुढाकारानेच ही बैठक होत आहे. (no invitation to shivsena of meeting which will held at ncp supremo sharad pawar residance)

केवळ सोयीचे ठिकाण म्हणून पवार यांचे निवासस्थान निवडले आहे. स्वतः शरद पवार यांनी ही बैठक बोलावलेली नाही, असा दावा या सूत्रांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक यांनी या बैठकीत सहभागी होणाऱ्यांची यादी ट्विटद्वारे प्रसिद्ध केली आहे. या बैठकीचे शिवसेनेला निमंत्रण नाहीय. शिवसेनेच्या नेत्याचं नाव निमंत्रितांच्या यादीत नाहीय. नवाब मलिक यांनी जाहीर केलेल्या यादीत शिवसेनेला स्थान नाहीय.

शरद पवार-उद्धव ठाकरे
रेल्वेत बसल्याचा सेल्फी पाठवला, पण तो घरी पोहोचलाच नाही

बैठकीमध्ये यशवंत सिन्हा, पवन वर्मा, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, भाकप सरचिटणीस डी. राजा, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला, न्या. ए. पी. शाह, जावेद अख्तर यासोबतच आशुतोष, माजिद मेमन, माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, के. सी. सिंह, सुधींद्र कुलकर्णी, कोलिन गोन्साल्विस, अर्थतज्ज्ञ अरुण कुमार, घनश्याम तिवारी, प्रितीश नंदी, ‘राजद’चे मनोज झा यांच्यासह काँग्रेसचे खासदार के. टी. एस. तुलसी आणि काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले माजी प्रवक्ते संजय झा यांचा समावेश असेल.

शरद पवार-उद्धव ठाकरे
"भाजपचे लोक म्हणजे शत्रू नाहीत"; शिवसेना नेत्याचं मोठं विधान

व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यात राष्ट्रीय पातळीवर इतर विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर काल दिल्लीमध्ये प्रशांत किशोर हे शरद पवार यांना पुन्हा एकदा भेटले. दीड तास चाललेल्या या बैठकीतील चर्चेचे मुद्दे गुलदस्तात असतानाच आज पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com