esakal | "भाजपचे लोक म्हणजे शत्रू नाहीत"; शिवसेना नेत्याचं मोठं विधान
sakal

बोलून बातमी शोधा

"भाजपचे लोक म्हणजे शत्रू नाहीत"; शिवसेना नेत्याचं मोठं विधान

"भाजपचे लोक म्हणजे शत्रू नाहीत"; शिवसेना नेत्याचं मोठं विधान

sakal_logo
By
विराज भागवत

प्रताप सरनाईक यांच्या 'लेटरबॉम्ब'नंतर आणखी एका शिवसेना नेत्याचे सूचक वक्तव्य

मुंबई: महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेसने (Congress) आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला. त्यातच शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसवर (Congress) पक्ष कमकुवत करण्याचा आरोप तर केलाच पण त्याचसोबत 'शिवसेनेने भाजपसोबत (BJP) जावं कारण त्यातच शिवसेनेचे हित आहे', असा विचारही मांडला. या मुद्द्यावरून सध्या राजकारण पेटलं असताना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही आता मोठं वक्तव्य केलं आहे. (Shivsena Leader Arvind Sawant says I have friends in BJP too as we dont treat oppositions as enemy)

हेही वाचा: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल; पुण्यातून एकाला अटक!

"भाजपमध्ये माझेही काही खास मित्र आहेत. राजकीय हेवेदावे आणि विचारधारा या भिन्न गोष्टी आहेत. पण आमचे वैयक्तिक स्तरावरील संबंध हे आजही चांगले आहे. आम्ही विरोधकांना शत्रू मानत नाही. जे सध्या घडतंय, त्या गोष्टीचे तुम्ही अवलोकन केले पाहिजे. भाजप शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे असं मी म्हणणार नाही. उलट ते दररोज आमच्या पक्षावर जोरदार टीका करत असतात पण तसं असलं तरी वैयक्तिक स्तरावर आमचे संबंध अजूनही चांगले आहेत", असं सूचक वक्तव्य खासदार सावंत यांनी केलं.

हेही वाचा: मुंबईत ६० लाख नागरीकांचं लसीकरण पूर्ण होणं गरजेचं

"महाविकास आघाडी ही समान किमान कार्यक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेली आघाडी आहे. या आघाडीत येताना कोणीही आपल्या पक्षाची विचारधारा बाजूला ठेवलेली नाही. प्रत्येकाला आपल्या आणि आपल्या पक्षाच्या भावना व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणी जर म्हणत असेल की २०२४ ला मुख्यमंत्रीपदी त्या पक्षाचा उमेदवार विराजमान होईल, तर ते बोलण्यात किंवा महत्त्वाकांक्षा ठेवण्यात काहीच गैर नाही", असेही सावंत म्हणाले.

हेही वाचा: प्रताप सरनाईकांची उच्च न्यायालयात धाव

"राज्यातील आघाडी सरकार हे योग्य पद्धतीने काम करत आहे. पत्रात लिहिल्याप्रमाणे शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव दिसून येत आहे. त्यामुळे त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी काही नेतेमंडळी अशी मते व्यक्त करत आहेत. पण मी एक नक्की सांगतो की महाविकास आघाडी १०० टक्के पाच वर्षे पूर्ण करेल यात शंका नाही", असेही त्यांनी स्पष्ट केले.

loading image