'त्या' 12 जागांसाठी नावे आलीच नाहीत! राज्यपालांची फटकेबाजी; कामगिरीबद्दल पुस्तकाचे प्रकाशन

'त्या' 12 जागांसाठी नावे आलीच नाहीत! राज्यपालांची फटकेबाजी; कामगिरीबद्दल पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : राजभवनातील एक वर्षाच्या कामगिरीबद्दल 'जनराज्यपाल: भगतसिंह कोश्यारी' या सचित्र पुस्तकाचे आणि ई बुकचे प्रकाशन राजभवन येथे छोटेखानी सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते झाले. यावेळी विधानरिषदेवरील नियुक्तीसाठी  12 नावे आलीच नाहीत, अशी माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारबाबत कोणतीही टीकाटिप्पणी न करता त्यांनी आज अनेक राजकीय विधाने केली.

परिषदेवर नेमण्यात येणारी नावे महाविकास आघाडीने पाठवली तरी, राज्यपाल मान्य करणार नसल्याचे बोलण्यात येत होते. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी ही नावे आलीच नसल्याचे सांगितले. कोव्हिड परिस्थितीत महाराष्ट्र सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवतो आहे. घटनात्मक प्रमुख म्हणून या नात्याने काय करायला हवे असे वाटते या प्रश्नावर त्यांनी प्रत्येकाने आपापले कर्तव्य पार पाडावे. तणावग्रस्त होऊन चालणार नाही. परिस्थितीशी दोन हात करावे लागतील, असे स्पष्ट केले. 
परीक्षा व्हायलाच हव्यात का, आजही परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत कोणत्याही निश्चित सूचना का आल्या नाहीत, यावर परिक्षा  कशा पद्धतीने घ्यायची ते सरकारने ठरवायचे आहे. योग्य काय अयोग्य काय यावर टिप्पणी करायला तुम्ही मोकळे आहात, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. वर्षपूर्तीनिमित्तचे ई बुक राजभवनच्या संकेतस्थळावर ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये क्यूआरकोड आणि इ लिंकचाही वापर करण्यात आला आहे. 

आम्ही सर्व एक आहोत!
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राउत यांनी केलेल्या टिकेचा विषय छेडताच राज्यपाल म्हणाले, ज्येष्ठांचे विचार ऐकून घेणे अन् छोटयांना समजून घेणे, असा माझा प्रयत्न असतो. आम्ही सगळे एक आहोत शरीराच्या एका भागाने काही म्हटले तर दुसऱ्याने काही वाटून घ्यायचे नसते .

रामप्रहरावर प्रहार नको!
गेल्या वर्षातील घडामोडींचा आढावा घेताना पहाटे झालेल्या  शपथविधीचा विषय निघताच राज्यपाल म्हणाले, पहाटेच्या वेळेला रामप्रहार म्हणतात. अशा वेळी ज्या घटना घडतात त्यावर प्रहार का करता ?

न घाबरणे आवश्यक! 
कोरोनाच्या भीतीमुळे घाबरून न जाता निर्भीड बना आणि सावधानता बाळगून कोरोनाला हरवू या, असा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com