MPSC परीक्षेत राजकारण नको, अभ्यास न झाल्याने परीक्षा पुढे ढकला : विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

MPSC परीक्षेत राजकारण नको, अभ्यास न झाल्याने परीक्षा पुढे ढकला : विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

मुंबई, ता. 8 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 11 ऑक्टोबरला राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली आहे. परंतु मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावरून ही परीक्षा पुढे ढकलण्याची जोरदार मागणी नेत्यांकडून होउ लागली आहे. या परीक्षेबाबत एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांनी अभ्यास न झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. तर काहींनी परीक्षेत राजकारण न आणता विद्यार्थ्यांच्या विविध परिस्थितींचा विचार करुन परीक्षा घ्याव्यात, अशी विनंती केली आहे.

कोरोनामुळे एमपीएससीची परीक्षा यापुर्वी दोन वेळा पुढे ढकवावी लागली आहे. यातच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयामुळे या परीक्षेला विरोध होऊ लागला आहे. यामुळे परीक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनाच्या कालावधीत अभ्यासासाठी शहरांमध्ये आलेले बहुतांश विद्यार्थी आपापल्या गावी परतले. यामुळे क्‍लास आणि ग्रंथालयांचा संपर्क तुटला. याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला असल्याचे, विद्यार्थी सांगत आहेत. परीक्षेसाठी आणखी एक ते दोन महिन्यांचा कालावधी दिल्यास विद्यार्थ्यांना तयारीनिशी परीक्षेला सामोरे जाता येईल, त्यासाठी परीक्षा आता घेउ नये, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

याबाबत एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या : - 

  • लॉकडाउनच्या कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास करता आला आही. क्‍लास, ग्रंथालयात अभ्यास करत होतो. परंतू आता घरी अभ्यास होत नाही. अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नसल्याने विद्यार्थ्यांना दोन तीन महिन्यांचा वेळे देणे आवश्‍यक आहे. - विनायक धस - विद्यार्थी, सांगली.
  • मी प्रथमच एमपीएससी परीक्षा देत आहे. लॉकडाउनमुळे ग्रंथालयात अभ्यास करता आला नाही. घरातील कामांमुळे अभ्यासात व्यत्यय येतो आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी कधीही तयार असले पाहिजे, असे माझे मत आहे. परंतू सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता घराबाहेर पडण्याची भिती वाटत आहे. मला घरापासून दूरवर परीक्षा केंद्र आले आहे. त्यामुळे प्रवासही सोयीस्कर नाही. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून परीक्षा पुढे ढकलणे योग्य वाटते. - सोनम म्हस्के - विद्यार्थीनी, मुंबई
  • घरची परिस्थिती बेताची आहे. गावापासून लांब राहून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू आहे. गेल्या एक वर्षापासून एमपीएससीचा अभ्यास करत असून, मे महिन्यात परिक्षा होणे अपेक्षीत होते. मात्र, आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर परिक्षा पुढे ढकलल्या, दोन वेळा परिक्षेचे वेळापत्रक बदलल्यामूळे आता मानसीक दडपण वाढले आहे. आता ही तिसरी वेळ आहे वेळापत्रकाची 11 ऑक्‍टोबर 2020 ला पेपर होणार असे आयोगाने नोटीस काढली हॉलतिकीत पण आल्या आहेत. आम्ही तयार पण आहोत. पेपर द्यायला आणि आता जर ही परीक्षा रद्द करण्याची मागणी होत असेल तर विद्यार्थ्यांचे मन खच्ची नाही होणार का?? आणखी किती दिवस परीक्षेची वाट पाहणार अश्‍या मागणीमुळे पुन्हा परीक्षा होणार की नाही हा प्रश्न निर्माण आम्हाला सतावतो? त्यामूळे यावेळीतरी परीक्षा होणे गरजेचे आहे. - रुपाली भांगे - विद्यार्थीनी, मुंबई
  • 2014 सालीही एमपीएससी परीक्षेवेळी असाच प्रश्‍न निर्माण झाला होता. परीक्षा झाली आणि प्रकरण मॅटकडे गेले. अजूनही त्यावर निर्णय आलेला नाही. न्यायालयीन गोष्टींचा अंदाज आपण कधीच बांधू शकत नाही. आयोगाने जाहीर केलेल्या परीक्षेवरून सध्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. यातच 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद असल्याने दुसऱ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर कसे जायचे हा मोठा प्रश्‍न आहे. कोरोनाच्या काळात युपीए परीक्षा घेतल्या. या परीक्षांना देशातील 47 टक्के तर राज्यातील 35 टक्के विद्यार्थी अनुपस्थित होते. परीक्षा देता न आल्याने या विद्यार्थ्यांचे नुकसानच झाले. आता या परीक्षेवेळीही असाच प्रकार घडू नये. कोरोनाच्या पार्श्‍वूभूमीवर बिहार, राजस्थान या सरकारने आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. असाच निर्णय राज्य सरकारकडून अपेक्षित आहे. - अनुप देशमुख - विद्यार्थी, सोलापूर.
  • जानेवारी 2019 पासून एमपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. कोरोना काळात दोन वेळा परीक्षा पुढे ढकलली. आमच्या भविष्याशी खेळण्याचा हा डाव चालला आहे. हे गलिच्छ राजकारण थांबवावे. युपीएससी परीक्षा ज्याप्रमाणे झाल्या त्याचप्रमाणेच एमपीएससी परीक्षा घ्यावी. - अभिषेक बाविस्कर - विद्यार्थी, अमरावती.

( संपादन - सुमित बागुल )

no need of politics over MPSC exams says postponed exmas due to less studies

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com