'राज्यात परीक्षेदरम्यान एकही विद्यार्थी कोरोनाबाधित नाही'; मंत्री उदय सामंत

तुषार सोनवणे
Friday, 6 November 2020

राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा पार पडल्या असून त्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले आहेत.

मुंबई - राज्यातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा पार पडल्या असून त्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत राज्यात झालेल्या परीक्षांबाबतचा अहवाल राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना पाठवणार आहेत.

शाळांना फक्त पाच दिवसच दिवाळी सुट्टी, शिक्षक संघटनांकडून तीव्र नाराजी

राज्यातील 13 विद्यापीठात काही अपवाद वगळता सगळ्या परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या होत्या.  यातील 2 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली. पास होण्याची टक्केवारी 93 टक्के आहे.  ज्या विद्यार्थ्यांना कंन्टेंन्टमेंट झोन, पूर आणि अन्य कारणामुळे परीक्षा देता आली नसेल. त्यांची परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना मिळणारी मार्कशीट नियमित असणार आहे. त्यात कोव्हिडचा उल्लेख नाही. महाविद्यालये तसेच विद्यापीठांनी दाखवून दिले आहे की, कठीण काळातही ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा घेऊन चांगला निकाल लागला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोना काळात परीक्षा देणारा एकही विद्यार्थी बाधित किंवा संक्रमित झालेला नाही. अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

वाहतूक पोलिसांवर हात उचलणं आता पडेल महागात, थेट परवाना रद्द करण्याची तरतूद

काही विद्यापीठांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेत असताना सायबर हल्ला झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्या चौकशी साठी समिती नेमली आहे. तरीही ज्या कंपन्यांकडून योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही. त्या कंपन्या ब्लॅकलीस्ट करणार असल्याचीही माहिती सामंत यांनी दिली. येत्या 8 ते 10 दिवसात यंत्रणा का डॅमेज झाली हे चित्र स्पष्ट होईल. सायबर सेल त्याची योग्य ती चौकशी करीत आहे.

कोरोना दिवाळी! सण साजरा करण्यासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

महाविद्यालये सुरू करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. दिल्ली, आणि केरळ मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुले आपल्या राज्यात अद्यापतरी महाविद्यालये सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती सामंत यांनी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no one student corona effected due exam in maharashtra