दिवाळीत फटाके फोडाल तर तुरुंगात जाल, मुंबईसह राज्यात निर्बंध येण्याची शक्यता

दिवाळीत फटाके फोडाल तर तुरुंगात जाल, मुंबईसह राज्यात निर्बंध येण्याची शक्यता

मुंबई : दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर बंदी येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट पोलिस कारवाई होऊन तुरुंगाचीही हवा खावी लागण्याची शक्यता आहे. मुंबईसह संपुर्ण महामुंबईसाठी दिवाळीत फटाके फोडण्याबाबत नियमावली तयार केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही आज फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्या बाबात भुमिका मांडली आहे. 

कोविडमुळे यंदा सर्वच सण साजरे करण्यावर निर्बंध आले होते. त्याचप्रमाणे मुंबईत दिवाळी सण साजरा करण्यावर निर्बंध येणार आहेत. थंडीत कोविडचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. तसेच, फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे कोविड रुग्णांची ऑक्सीजन पातळी घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याचा धोका आहे. तसेच फटके फोडण्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळेही कोविडचा संसर्ग होण्याची शक्यता आहे अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. फटाक्यांबाबत दोन दिवसात नियमावली तयार करण्यात येईल असे अतिरीक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी सांगितले.

मुंबईत मरिन ड्राईव्ह, वरळी सिफेस, शिवाजी पार्क, जूहू बिच तसेच इतर भागातील मैदानांमध्ये, रस्त्यावर फटाके फोडले जातात. अशा सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर बंदी येण्याची शक्यता आहे. सोसायटी आणि घरांच्या आवारात मर्यादित स्वरुपात फटाके फोडण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर आजही साथ नियंत्रण कायदा १८९७, आपात्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ लागू आहे. त्यामुळे या कायद्याचे उंल्लंघन झाल्यास थेट तुरुंगाची हवाही खावी लागणार आहे. पालिका आणि पोलिस मिळून ही कारवाई करण्याची शक्यता आहे.

फटाक्यांच्या धुरात टॉक्झिसिटी खूप असते. थंडीमुळे तो धुर वर जाऊ शकत नाही. त्यामुळे श्‍वसनाला अधिक बाधा निर्माण होऊ शकते. यासंदर्भात अधिक काळजी घेण्याची गरज आहे. फटाकेमुक्त दिवाळी आपल्याला कशी साजरी कराता येईल ही मानसिकता आतापासूनच ठेवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मंत्रीमंडळाच्या बैठकीतही याबाबत आग्रह धरणार आहे.असे आरोग्यमंत्री राजेश टाेपे यांनी सांगितले.

मर्यादित स्वरुपात फटाके फोडताना सॅनिटायझरचा वापर करणे सक्तीचे करण्यात येणार आहे. मात्र, हा निर्णय अपघाताला नियंत्रण ठरु शकेल. सॅनिटायझरमुळे आग लागण्याची भिती  तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

( संपादन - सुमित बागुल )

no permission for bursting firecrackers on public places during diwali

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com