Pollution Control : 'नो पीयूसी... नो फ्युएल' उपक्रम प्रभावीपणे राबविणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik : प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्रात प्रत्येक पेट्रोल पंपावर ‘नो पीयूसी, नो फ्युएल’ उपक्रम राबवला जाणार असून, वैध प्रदूषण प्रमाणपत्राशिवाय वाहनांना इंधन मिळणार नाही.
Pollution Control

Pollution Control

Sakal

Updated on

मुंबई : भविष्यातील पिढीला प्रदूषण मुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरण पूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) हे वैध असणे गरजेचे आहे. अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे, यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर 'नो पीयूसी नो फ्युएल' उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. या अनुषंगाने परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सह सचिव (परिवहन) राजेंद्र होळकर यांच्या सह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com