esakal | कुणी शिक्षक देता का?
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जत : कुरुंग जिल्हा परिषद शाळा

सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षणापासून शाळाबाह्य मुले वंचित राहू नये, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सध्या कर्जत तालुक्‍यातील कुरुंग गावी शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ‘कुणी शिक्षक देता का शिक्षक?’ अशी म्हणण्याची वेळ येथील पालक व विद्यार्थ्यांवर आली आहे.

कुणी शिक्षक देता का?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कर्जत (बातमीदार) : सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षणापासून शाळाबाह्य मुले वंचित राहू नये, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सध्या कर्जत तालुक्‍यातील कुरुंग गावी शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ‘कुणी शिक्षक देता का शिक्षक?’ अशी म्हणण्याची वेळ येथील पालक व विद्यार्थ्यांवर आली आहे. शिक्षकासाठी वेळोवेळी मागणी करूनही शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांचा पाया असतो. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या आहे. कर्जत तालुक्‍यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरुंग गावात पहिली ते पाचवीपर्यंतची रायगड जिल्हा परिषदेची शाळा आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी येथील कायमस्वरूपी शिक्षकाच्या गैरवर्तणुकीमुळे ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्यांची बदली करण्यात आली. मात्र, त्यांच्या जागेवर आजतागायत दुसऱ्या शिक्षकाची नेमणूक झाली नसल्याने या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

दक्षिण मुंबईतील हँकॉक पूल पडला महागात... कुणाला आणि कसा ते  वाचा

सध्या तात्पुरत्या स्वरूपात बदली शिक्षक येऊन शाळा सुरू ठेवत आहेत; परंतु तेही नियमित येत नसल्याने शाळा बंद राहत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रोज बदलून येणाऱ्या शिक्षकांमुळे मुलांची अध्ययनाची प्रगती खुंटली आहे. 

शाळेत नियमित होणाऱ्या परीक्षाही घेतल्या जात नाहीत. शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांना आद्यक्षरांची ओळख, बाराखडी, यांसारखे प्राथमिक ज्ञान नाही. त्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाच्या या उदासीनतेमुळे आमच्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधःकारमय होण्याची शक्‍यता पालक व्यक्त करत आहेत. 

लग्‍नाचा मंडप टाकला, नातेवाईकही आले; पण... पुढे नक्की काय घडले ते वाचा

आमच्या कुरुंग शाळेवर कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मी वारंवार या संदर्भात शिक्षण विभागाकडे मागणी केली; मात्र आश्वासनापलीकडे काही मिळत नाही.
- बबन भालेराव, सामजिक कार्यकर्ते कुरुंग

कुरुंग शाळेवर नियुक्ती असलेले राहुल गोसावी हे काही महिन्यांपासून रुजू होत नाही. त्यामुळे आम्ही केंद्रातील १४ शाळांमधून एक एक शिक्षक अदलून बदलून या शाळेवर पाठवून विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतो. शाळाही नियमित सुरू ठेवली आहे.
- दत्तात्रेय पवार, केंद्रप्रमुख केंद्रशाळा, वारे

आज या शाळेचा शिक्षक, तर उद्या दुसऱ्या, परवा तिसऱ्याच शाळेचा शिक्षक आमच्या पोरांना शिकवत आहे. त्यामुळे आमच्या मुलांचे अभ्यास होत नाही. परीक्षाही घेतल्या जात नाही. याविषयी आम्ही शिक्षण विभागात वारंवार अर्ज केलेत; मात्र अजूनही शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाही.
- कांचन भोईर, ग्रामस्थ, कुरुंग

शाळेवर शिक्षकच नसल्याने माझे जूनपासूनच मानधन मिळाले नाही. आता येणारे शिक्षकही नियमित येत नाहीत. त्यामुळे माझ्या मुलांचीही शैक्षणिक प्रगती खुंटली आहे. 
- योगिता भोईर, मध्यान्न भोजन स्वयंपाकी

loading image