कळवा, मुंब्रामध्ये गेल्या 4 दिवसांपासून 'पाण्याची आणीबाणी'

कळवा, मुंब्रामध्ये गेल्या 4 दिवसांपासून 'पाण्याची आणीबाणी'

मुंबई: एमआयडीसी'ची जलवाहिनी फुटल्याने दुरुस्तीच्या नावाखाली ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाने शुक्रवार पासून  मुंब्रा कळवा परिसरात पाणी पुरवठा बंद केला आहे. गेल्या ४ दिवसांपासून मुंब्रा कळवा परिसरात पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. या परिसरातील नागरिकांना पाण्याच्या समस्याला सध्या मोठे तोंड द्यावे लागत आहे. कळवा आणि मुंब्रातील महिलांना 'बोअरवेल'चे पाणी भरण्यासाठी हापस्यावर गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांवर 'पाणीबाणी'ची सध्या वेळ आली आहे.

शीळफाटा परिसरात गेल्या आठवड्यात 'एमआयडीसी'ची जीर्ण झालेली जलवाहिनी फुटली. ती दुरुस्ती केल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा फुटली. त्यामुळे मुंब्रा, कौसा, कळवा परिसरात पाणी पुरवठा बंद करण्यात आला. गेल्या दोन दिवसांनंतर दिवसातून एकदाच कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे गरजेपेक्षा कमी पाणीपुरवठा होत असल्याने या परिसरातील महिलांनी परिसरातील 'बोअरवेल'वर गर्दी केली आहे. त्यामुळे पाण्यासाठी महिलांची कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.

कळव्यातील 'शुद्धपाणी पुरवठा' प्रकल्प बंद

कळव्यातील नागरिकांना पिण्याचे स्वस्त दरात पाणी मिळावे म्हणून ठाणे महापालिकेने कळवा तरण तलावाजवळ मागील ठाणे महापालिका निवडणुकीआधी लाखो रुपये खर्च केले. तत्कालीन आयुक्त संजय जयस्वाल यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. 10 रुपयांना 20 लीटर शुद्धपाणी अशी योजना असल्याने नागरिकांची गर्दी होत असे हे पाणी पुरवण्याचे काम 'वॉटर लाईफ',या कंपनीला देण्यात आले होते.  मात्र हा प्रकल्प जेमतेम एक वर्ष चालला. मात्र सध्या हा प्रकल्प 'धुळखात' पडल्याने मशनरी गंजलेल्या आहेत. आताच्या पाण्याच्या समस मशनरी गंजलेल्या आहेत. 

पाण्याच्या समस्याच्या वेळी 'बोअरवेल'चे पाणी पिण्यासाठी वापरण्याऐवजी या शुद्धपाणी पुरवठा प्रकल्पाचा लोकांना फायदा झाला असता त्यामुळे या बंद प्रकल्पामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पाणीबिलाची करवसुली जोरात

लोकांचे पाण्याचे हाल होत असताना कळवा प्रभाग समितीची पाणी वसुली मात्र जोरात सुरू आहे. पाणी पुरवठा सुरू झाला असून सध्या तो कमी दाबाने सुरू आहे रात्री पर्यंत सुरळीत होईल.
विनोद पवार, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग,ठाणे महापालिका

शुद्धपाणी पुरवठा प्रकल्प कंपनीकडे हा प्रकल्प पुन्हा सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला असून जुन्या मशनरी बदलून पुन्हा हा प्रकल्प लवकरच सुरू केला जाईल.
अपर्णा साळवी, स्थानिक नगरसेविका
 

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

No Water mumbra kalva report from last four days Ladies facing problem

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com