

Thane Noise Pollution
ESakal
ठाणे : गणरायाला निरोप देताना ठाणेकरांनी शनिवारी भक्तिभावासोबत आवाजाची मर्यादाही ओलांडली. 'डीजे'चा दणदणाट कमी झाला असला, तरी ढोल-ताशे, बॅन्जो आणि ध्वनिक्षेपकांच्या कानठल्या बसवणाऱ्या आवाजाने शहर दणाणून गेले. विविध ठिकाणी ध्वनिपातळी १०५ डेसिबलपर्यंत पोहोचल्याने ध्वनिप्रदूषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.