गणेशोत्सवानंतर खवय्यांचा मांसाहाराकडे मोर्चा

चिकन, मासळी, मटणाला मागणी; चिकन दरात ३० ते ४० रुपयांनी वाढ
nonveg food
nonveg foodsakal media

वाशी : श्रावण महिना त्यानंतर गणेशोत्सवामुळे गेले दीड महिने चिकन, मटण, मासळीला फारशी मागणी (nonveg food) नव्हती. रविवारी अनंत चतुर्दशीच्या (Anant chaturdashi) दिवशी गणेशोत्सवाची सांगता होताच खवय्यांचा मोर्चा चिकन, मटण, मासळीकडे वळला आहे. मागणीत वाढ होत असल्याने आठवड्यापूर्वी २०० रुपये किलो असलेल्या चिकनच्या (chicken rate) दरात ४० रुपयांनी वाढ झाली आहे. नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होईपर्यंत पुढील १५ दिवस चिकन, मटण, मासळीला खवय्यांकडून मागणी राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

nonveg food
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच

आठवड्यातून किमान दोनदा सामिष पदार्थांचा आस्वाद घेणारे खवय्ये श्रावण महिना आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या गणेशोत्सवात मांसाहार पदार्थ वर्ज्य करतात. गेले दीड महिने खवय्यांनी कटाक्षाने निरामिष पदार्थांचे सेवन केले. रविवारी (ता. १९) गणेशोत्सवाची सांगता झाली. मात्र, सोमवारी अनेक जण मांसाहाराचे सेवन करत नसल्याने दुकानांवर गर्दी नव्हती. त्यानंतर नागरिकांनी मांसाहारावर ताव मारण्यास मागे हटले नाही. चिकन, मटण, मासळी खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. या सर्वांच्या दरात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

दिघा येथील प्रतिक कुपले म्हणाले की, गणेशोत्सवानंतर मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे. खवय्यांची पसंती सुरमई, रावस, पापलेट, हलवा या मासळीला आहे. खोल समुद्रातील मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे. लहान आकाराच्या सुरमईच्या दरात घट झाली आहे. खोल समुद्र, नदी तसेच खाडीतील मासळीची आवक चांगली होत आहे. मटणाच्या मागणीत वाढ झाली असून, उपाहारगृह तसेच किरकोळ ग्राहकांकडून मटणाला मागणी चांगली असल्याचे सांगितले. तसेच, चिकनच्या दरात ४० रुपयांनी वाढ झाली असून २४० प्रति किलो, तर मटण ६६० रुपये किलोने विक्री होत आहे. दीड महिन्यानंतर मांसाहार खाण्याचा आनंद अनेक खवय्ये लुटत आहेत. यात मांसाहाराचा वाढलेल्या दराकडे दुर्लक्ष करून अधिकचे पैसे खर्च करण्यासही तयार होत आहेत.

nonveg food
मुंबईत सक्रिय रुग्णांचा आलेख चढाच!

मटण, मासळी, चिकनचे दर (प्रति किलो, रुपयांत)

मटण - ६६० रुपये

चिकन- २३० ते २४० रुपये

इंग्लिश अंडी- ६० रुपये डझन (पाच रुपये नग)

गावरान अंडी- १२० रुपये डझन (दहा रुपये नग)

सुरमई- २४० ते ६०० रुपये

पापलेट- ४८० ते १३०० रुपये

हलवा- ४४० ते ५५० रुपये

रावस- ६०० ते ८०० रुपये

"गेल्या आठवड्यात चिकनचे दर २०० रुपये किलो होते. गणेशोत्सव संपताच खवय्यांकडून चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे. चिकनच्या दरात किलोमागे ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे. इंग्लिश अंड्यांचे दर स्थिर आहेत. वातावरणात गारवा वाढल्याने गावरान अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे."

- बबन नाईककोंडी, व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com