पुढील उपचाराकरिता वाघिणीला पिंजराबंद करण्यात आले. पांढरकवडा येथील पशुसंवर्धन अधिकारी डॉ. रणजित नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील योग्य ते औषधोपचार करण्यात येत आहेत.
मुंबई : टिपेश्वर अभयारण्यातील (Tipeshwar Sanctuary) पिसी वाघिणीच्या गळ्यात तारेचा फास अडकला होता. २ फेब्रुवारीपासून शोध व बचाव मोहीम चालू होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना याची माहिती मिळताच त्यांनी यामध्ये तत्काळ कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर वेगाने सूत्रे फिरली. अखेर त्या वाघिणीला फासमुक्त करून जीवदान देण्यास टिपेश्वर अभयारण्य प्रशासनाला यश आले.