TB Patinet
TB Patinetsakal

औषधास दाद न देणाऱ्या टीबीचा मुंबईला धोका

सद्यस्थितीत ९९७ रुग्णांवर उपचार सुरू

मुंबई : क्षयरोगाचा एक प्रकार असलेल्या एमडीआर अर्थात मल्टिड्रग्ज रेझिस्टन्सच्या तब्बल ९९७ रुग्णांवर मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. एमडीआरमध्ये रुग्णांवर कोणत्याही औषधांचा फारस परिणाम होत नाही. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत मुंबईत क्षयरोगाचे १३ हजार ९२ रुग्ण आढळून आले. त्यात एमडीआरच्या ९९७ रुग्णांचा समावेश आहे. २०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जागतिक क्षयदिनानिमित्त पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१८ मध्ये पालिकेने ५७ हजार ०३१ क्षयरोगाच्या रुग्णांची नोंद केली. त्यात पाच हजार ५९४ एमडीआरचे तर ६३८ एक्सडीआरचे रुग्ण होते. २०१९ मध्ये ६० हजार ५९७ रुग्णांचे निदान झाले. २०२० मध्ये ते प्रमाण कमी होत ४३ हजार ४६४ पर्यंत कमी झाले. त्याचप्रमाणे २०२१ मध्ये ही संख्या ५८ हजार ८४० पर्यंत वाढली.

मुंबईत क्षयरोगामुळे झालेले मृत्यू

  • २०१८ - १४१७

  • २०१९ - १४७८

  • २०२० - १३५२

  • २०२१ - १९१७

  • २०२२ - २०४

''एमडीआर रुग्णांचे निदान करण्यासाठी पालिकेकडे आधुनिक यंत्रणा उपलब्ध आहे. पहिल्यांदा क्षयरोगाचे निदान झाल्यावेळीच तो रुग्ण एमडीआरचा आहे की नाही तेदेखील आपल्याला कळते. एलपीए म्हणजेच ‘लाईन प्रोब अॅसे’ या थुंकीद्वारे केलेल्या चाचणीतूनही योग्य निदान केले जाते.''

- डॉ. प्रणिता टिपरे, उप-आरोग्य कार्यकारी अधिकारी (क्षय विभाग), महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com