
धारावी : धारावी कोरोनाचा हाॅटस्पाॅट असल्याने धोबीघाट येथील धारावी व सायन विभागाला जोडणारा पादचारी पूल पालिकेतर्फे बंद करण्यात आला आहे; मात्र त्यामुळे परिसरातील एका वृद्धाला रुग्णालयात वेळेवर नेता न आल्याने जीव गमवावा लागला. बुधवारी (ता. 22) ही घटना घडली. त्यामुळे किमान अशा आणीबाणीच्या स्थितीत तरी पुल वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी धारावी नागरिक संघाने केली आहे.
मोठी बातमी : रायगडमध्ये सामुदायिक नमाज पठणाला बंदी
बबन पवार (वय 60) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. धोबीघाट येथे शौचालयास जात असताना दुपारी अचानक रस्त्यावर चक्कर आल्याने ते कोसळले. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतरही त्यांना अस्वस्थता जाणवत होती. धोबीघाट परिसरापासून सायन रुग्णालय 10 मिनिटाच्या अंतरावर आहे; मात्र, पादचारी पूल बंद असल्याने त्यांना त्या मार्गाने रुग्णालयात नेता येत नव्हते. तसेच, वाहनही मिळत नव्हते. पोलिसांनी व स्थानिकांनी रुग्णवाहिका मिळावी यासाठी प्रयत्न केले; मात्र रुग्णवाहिका दोन तासाने आल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डाॅक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
बबन पवार यांना वेळीच उपचार मिळाले असते, तर त्यांचा जीव वाचू शकला असता, असे धारावी नागरिक संघाचे अध्यक्ष सिध्दार्थ मेढे सांगितले. दरम्यान, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र रहिवाशांनी ह्रदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली आहे.
Not receiving treatment in time Death of an old man in dharavi
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.