वरळीतल्या अट्रीया मॉलला नोटीस, अग्निप्रतिबंधक व्यवस्था सदोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरळीतल्या अट्रीया मॉलला नोटीस, अग्निप्रतिबंधक व्यवस्था सदोष

नागपाडा येथील सिटी सेंट्रलला लागलेल्या आगीनंतर आता वरळी येथील अट्रीया मॉलमध्येही अग्निप्रतिबंधक यंत्रणा सदोष असल्याचे आढळले आहे. त्या प्रकरणात मॉलच्या व्यवस्थापनाला नोटीस पाठविण्यात आली आहे.

वरळीतल्या अट्रीया मॉलला नोटीस, अग्निप्रतिबंधक व्यवस्था सदोष

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई: नागपाडा येथील सिटी सेंट्रलला लागलेल्या आगीनंतर आता वरळी येथील अट्रीया मॉलमध्येही अग्निप्रतिबंधक यंत्रणा सदोष असल्याचे आढळले आहे. त्या प्रकरणात मॉलच्या व्यवस्थापनाला नोटीस पाठविण्यात आली असून बेकायदा बांधकामाची ही पाहाणी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीत सादर करण्यात आली आहे.

महापालिकेने ८ नोव्हेंबरला अट्रीया मॉलची पाहणी केली होती. त्यात,अग्निप्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटी दूर करण्यासाठी अग्निप्रतिबंधक आणि जीव संरक्षक उपाययोजना 2006 नुसार नोटीस जारी करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे मॉलमधील बेकायदा बांधकाम असण्याची शक्यता आहे. त्याबाबत पालिकेच्या जी दक्षिण प्रभागाचे पदनिर्देशीत अधिकारी, इमारत कारखाने विभागाचे सहाय्यक अभियंता आणि इमारत प्रस्ताव विभागाचे कार्यकारी अभियंता यांना या मॉलची पाहाणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती प्रशासनाने स्थायी समिती सादर केली आहे.

अधिक वाचा-  नितीशकुमारांची वरात काढून त्यात घोडे नाचवले जातील, सामनातून भाजपवर टीका

महानगर पालिकेने व्यावसायिक आणि औद्योगिक तसेच विविध संकुलातील अग्निप्रतिबंधक यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी अग्निसुरक्षा पालन कक्ष सुरु आहे. यात,अग्निशमन दलाचे अधिकारी, संबंधित प्रभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असतो. या कक्षातर्फे नियमितपणे विविध ठिकाणचाी पाहाणी केली जाते. अग्नि प्रतिबंधक यंत्रणा सदोष असल्याने त्यातील त्रुटी दूर करण्याची नोटीस दिली जाते. त्याच बरोबर बेकायदा बांधकाम अथवा बेकायदा अंतर्गत बदल असल्यास त्यावर कारवाई केली जाते.

अधिक वाचा-  चित्रपटगृह मालकांमध्ये कभी खुशी कही गम; नवीन चित्रपट, SOPचा खर्च परवडणारा नाही

2006 च्या कायद्यानुसार संकुलांना त्यांच्या अंतर्गत अग्निप्रतिबंधक यंत्रणेचा आढावा घेऊन त्याचा अहवाल अग्निशमन दलाला सादर करावा लागतो. या अहवालाच्या आधारावर अग्निसुरक्षा पालन कक्षाकडून तपासणी केली जाते.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Notice to Atria Mall in Worli faulty fire protection system

loading image
go to top