'टोरंट' प्रकल्पाच्या रस्त्यासाठी शेतकऱ्यांना नोटिसा, ६०० एकर वनक्षेत्र बाधित होणार; जमीन मोजणीची प्रक्रिया पुन्हा सुरु
Torrent Project: सायडोंगर परिसरातील टोरंट प्रकल्पाला राज्यभरातून तीव्र विरोध होत आहे. असे असले तरीही प्रशासनाने प्रकल्पाच्या प्रवेश रस्त्यासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे.
कर्जत : सायडोंगर परिसरातील टोरंट पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाला राज्यभरातून तीव्र विरोध होऊनही प्रशासनाने प्रकल्पाच्या प्रस्तावित प्रवेश रस्त्यासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.