

Chhota Rajan Acquitted
ESakal
मुंबई : शिवसेना नेते अजय भोसलेंवर २००९मध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने कुख्यात गुंड छोटा राजनसह पाच जणांची शुक्रवारी (ता. ३०) निर्दोष सुटका केली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ११ ऑक्टोबर २००९ रोजी पुण्याच्या कोरेगाव भागात दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अजय भोसलेंवर गोळ्या झाडल्या होत्या, या हल्ल्यात अजय भोसले बचावले.