धारावीत आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; घरात ८ जण, दररोज जायचा नमाज अदा करायला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 एप्रिल 2020

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी. मुंबईतील धारावी झोपडपट्टीत नॉवेल कोरोना व्हायरसमुळे होणारा COVID19 चा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलाय.

मुंबई - मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी. मुंबईतील धारावी झोपडपट्टीत नॉवेल कोरोना व्हायरसमुळे होणारा COVID19 चा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलाय. मुंबईतील धारावी झोपडपट्टी म्हणजे तीच झोपडपट्टी जिला आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखलं जातं. या झोपडपट्टीत अत्यंत दाटीवाटीच्या परीसर आहे आणि मुंबईतील सर्वात जास्त दाट लोकवस्ती असलेलं एक ठिकाण म्हणजे धारावी झोपडपट्टी. मुंबईतील धारावी झोपडपट्टीची लोकसंख्या विचाराल तर ती साधारण आठ साडेआठ लाखांच्या पुढे. आणि याच आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाल्याची बातमी आता समोर येतेय. 

दुर्दैवाची बाब म्हणजे धारावीतील या ५६ वर्षीय इसमाचा मुंबईतील सायन रुग्णालयात मृत्यू झालाय.

HDFC ग्राहकांनो कर्जाचा हफ्ता पुढे ढकलायचाय; जाणून घ्या 'सर्व' माहिती...

मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर कोरोना रुग्ण ज्या धारावीतील घरात राहतो तिथं दोघे तिघे नव्हे तर एकूण ८ लोकं राहतात. हा रुग्ण दररोज जामिया मशिदीत नमाज पढण्यासाठी जात होता. या मशिदीत दररोज शेकडो लोकं जात येत असतात आणि ही सर्व माहिती या रुग्णानेच प्रशासनाला दिली आहे. सदर रुग्णाला २३ तारखेला कोरोनाची लक्षणं दिसायला सुरवात झाली. यानंतर त्रास वाढला, वाढलेला त्रास पाहून हा इसम स्वतःच २९ तारखेला सायन रुग्णालयात दाखल झाला.  आपण कुठेही कुठेही बाहेरगावी गेलो नसल्याचं सांगितलंय.

धक्कादायक ! वरळी कोळीवाड्यात १० कोरोना पॉझिटिव्ह

सदर रुग्णाचं एक कपड्यांचं दुकान असल्याची माहिती समोर आलीये. हा इसम धारावीतील ज्या इमारतीत राहतोय ही SRA ची इमारत देखील पोलिसांनी आता पूर्णपणे सील केलेली आहे.

novel corona virus covid 19 patient detected from biggest slum dharavi  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: novel corona virus covid 19 patient detected from biggest slum dharavi