esakal | HDFC ग्राहकांनो कर्जाचा हफ्ता पुढे ढकलायचाय; जाणून घ्या 'सर्व' माहिती...
sakal

बोलून बातमी शोधा

HDFC ग्राहकांनो कर्जाचा हफ्ता पुढे ढकलायचाय; जाणून घ्या 'सर्व' माहिती...

022-50042333 किंवा 022-50042211 नंबरवर फोन करून तुम्ही तुमचा कर्जाचा हप्ता पुढे ढकलण्यासाठी सांगू शकता

HDFC ग्राहकांनो कर्जाचा हफ्ता पुढे ढकलायचाय; जाणून घ्या 'सर्व' माहिती...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर RBI ने सर्व बँकांना आपल्या कर्ज ग्राहकांना तीन महिने EMI मध्ये सुट देऊन कर्जाचे हफ्ते तीन महिन्यानंतर वसूल केले जावेत असा सल्ला दिला होता. सध्याची संवेदनशील परिस्थिती पाहता SBI, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, IDBI, बँक ऑफ बडोदा आदी बँकांनी आपल्या करदात्यांना मुभा देत EMI तीन महिने पुढे ढकलले आलेत. 

प्रायव्हेट बँक असणाऱ्या HDFC बँकेतूनही अनेकजण लोन घेत असतात. या ग्राहकांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे HDFC बँक आपल्या ग्राहकांना दिलासा देणार का याबाबत कर्ज ग्राहकांकडून मोठी चिंता व्यक्त केली जात होती. अशात आता HDFC बँकेकडून लोक अकाउंट होल्डर्स म्हणजेच कर्ज ग्राहकांना दिलासा मिळालाय. या बाबतचे मेसेजेस आज अनेक HDFC ग्राहकांना आले आहेत. 

भीषण ! ना मास्क, ना ग्लोव्ज; इथं नागरिकांना लॉकडाऊन संपलाय असं वाटतंय बहुदा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर HDFC कडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत.  यामध्ये तुम्ही बँकेच्या EMI वर moratorium म्हणजेच कर्जफेड पूढे ढकलण्याचा कायदेशीर अधिकार वापरू शकतात. अशात तुम्हाला जर तुमचे कर्जाचे हफ्ते पुढे ढकलायचे असतील तर HDFC बँकेशी तुम्हाला बँकेशी संपर्क साधावा लागणार आहे.

मात्र त्या आधी जाणून घेऊयात कुणाला मिळेल 'या' सुविधेचा लाभ  

  • EMI पुढे ढकलण्याचा लाभ 'त्या' सर्व ग्राहकांना मिळेल ज्यांनी १ मार्च २०२० च्या आधी बँकेकडून कर्ज घेतलंय किंवा किरकोळ पत सुविधेचा लाभ घेतायत असे सर्व गग्राहकांचा यामध्ये समावेश करण्यात आलाय.   
  • १ मार्च २०२० च्या आधी थकबाकी असलेले ग्राहक देखील 'कर्ज अधिस्थगन' सुविधेचा लाभ घेऊ शकतात. याबाबतीत बँक ग्राहकांच्या योग्यतेनुसार 'कर्ज अधिस्थगन' सुविधा वापरू शकतात की नाही याबाबत निर्णय घेईल. 
  • Sustainable Livelihood Initiative अंतर्गत संलग्न असलेली सर्व शेती कर्ज यांचा देखील देखील यामध्ये समावेश असेल 
  • या सुविधेसाठी सर्व कॉर्पोरेट तसंच एसएमई ग्राहक देखील पात्र आहेत

खूप महत्त्वाचं : कोरोना लॉकडाऊनमुळे सुधारतोय 'ओझोन'चा थर, शास्त्रज्ञ म्हणतायत...

त्यामुळे आता HDFC बँकेने देखील आपल्या ग्राहकांना EMI मोरेटोरियम आणि क्रेडिट कार्डची थकबाकी वसूल करण्यासंदर्भात मोठा दिलासा दिलाय. यासाठी तुम्हाला कर्जाचा हफ्ता पुढे ढकलण्यासाठीची सहमती द्यावी लागेल. यासाठी 022-50042333 किंवा 022-50042211 नंबरवर फोन करून तुम्ही तुमचा कर्जाचा हप्ता पुढे ढकलण्यासाठी सांगू शकतात.

important announcement by hdfc bank about emi moratorium step by step process 

loading image