आता ब्रेथ ऍनालायझर चाचणीही बंद...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याच्या शक्‍यतेने वाहतूक पोलिसांचा निर्णय

मुंबई : देशभरात प्रादुर्भाव झालेला कोरोना हा विषाणूजन्य आजार सांसर्गिक असल्यामुळे मद्यपी वाहनचालकांची ब्रेथ ऍनालायझर चाचणी बंद करण्यात आली आहे. ब्रेथ ऍनालायझरमुळे संसर्ग होण्याची शक्‍यता असल्याने हा निर्णय घेतल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

कोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस?

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी खासगी कंपन्यांना 50 टक्के मनुष्यबळावर कामकाज चालवण्याचा आदेश दिला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी बाधा झालेले रुग्ण ठेवलेल्या रुग्णालयांच्या परिसरातील वाहतूक बंद करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. नागरिकांनी एकत्र जमू नये म्हणून शाळा-महाविद्यालये, जलतरण तलाव, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद ठेवण्यात आली आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर D-Mart बद्दल महत्त्वाची बातमी 

वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस ठिकठिकाणी नाकाबंदी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करतात. मद्यपान केलेल्या वाहनचालकांना पकडण्यासाठी ब्रेथ ऍनालायझर उपकरणाने चाचणी केली जाते. या उपकरणाच्या वापरामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्‍यता असून, पोलिसांनाही बाधा होऊ शकते. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वाहतूक चौक्‍यांना काही दिवस ब्रेथ ऍनालायझर चाचणी बंद करण्याचा आदेश दिला आहे.

Now Breath Analyzer Test stoped... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Breath Analyzer Test stoped...