बुलेट ट्रेन कर्मचाऱ्यांना आता जपानी भाषेचे धडे

बुलेट ट्रेन कर्मचाऱ्यांना आता जपानी भाषेचे धडे

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा केंद्र सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी कुठलीही कसर शिल्लक राहू नये, या दृष्टीने सध्या नियोजन केले जात आहे. जपानी तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या (एनएचआरसीएल) एकूण 72 कर्मचाऱ्यांनी जपानी भाषा अवगत केली आहे. 

द जपान फाउंडेशनमार्फत विविध प्रकल्प कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना जपानी भाषा शिकल्यानंतर प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. जपानी भाषा आणि संस्कृती प्रशिक्षण कार्यक्रमासाठी हे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी पाच महिन्यांचा विशेष अभ्यासक्रम आखण्यात आला होता. 

एनएचआरसीएलच्या मुंबई, बडोदा, पालघर, अहमदाबाद, सुरत आणि दिल्लीतील कॉर्पोरेट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले. नएचआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे नुकतेच वितरण करण्यात आले. हायस्पीड रेल टेक्‍नॉलॉजी ही जपानी शिन्कानसेन ट्रेन टेक्‍नॉलॉजीच्या माध्यमातून अवगत करण्यात आलेली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये भाषेच्या व्यवहारासाठी, तसेच भाषा अवगत करण्यासाठीची गरज म्हणून हा अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला होता.

जपान फाउंडेशनने हा अभ्यासक्रम तयार करताना जपानी भाषा संभाषणासाठी शिकणे आणि जपानी संस्कृतीचा अभ्यास या गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश केला. गेल्या दीड वर्षापासून हा अभ्यासक्रम एनएचआरसीएलमध्ये राबविण्यात येत असून, आतापर्यंत एनएचआरसीएलच्या एकूण 140 कर्मचाऱ्यांनी जपानी भाषेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

now bullet train employees will have to learn Japanese language 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com