मॅडम सुट्टे पैसे घ्या आणि पाचशेची नोट द्या ना...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 December 2019

चेंबुर येथील टिळकनगर येथे रहाणारे करण गुरुसिंग (38) यांचे खारघर सेक्टर-6 मध्ये प्रिमियम टाईम एलएलपी नावाचे घडयाळाचे दुकान असून गत 12 डिसेंबर रोजी दुकानात रुपाली धुमाळ ही कर्मचारी दुकानातील कॅश काऊंटरवर असताना, अज्ञात चोरटा त्यांच्या दुकनात सुट्टे पैसे देण्याच्या बहाण्याने आला होता. यावेळी सदर चोरटयाने पाचशे रुपयांचे सुट्टे पैसे देऊन रुपालीकडून 500 रुपयांची नोट घेतली.

चेंबुर येथील टिळकनगर येथे रहाणारे करण गुरुसिंग (38) यांचे खारघर सेक्टर-6 मध्ये प्रिमियम टाईम एलएलपी नावाचे घडयाळाचे दुकान असून गत 12 डिसेंबर रोजी दुकानात रुपाली धुमाळ ही कर्मचारी दुकानातील कॅश काऊंटरवर असताना, अज्ञात चोरटा त्यांच्या दुकनात सुट्टे पैसे देण्याच्या बहाण्याने आला होता. यावेळी सदर चोरटयाने पाचशे रुपयांचे सुट्टे पैसे देऊन रुपालीकडून 500 रुपयांची नोट घेतली.

सुट्टे पैसे देण्याच्या बहाण्याने खारघर सेक्टर-6 येथील एका घडयाळाच्या दुकानात गेलेल्या एका चोरटयाने दुकानातील महिला कर्मचाऱयाची नजर चुकवून दुकानाच्या गल्ल्यातील 14 हजार 880 रुपयांची रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर चोरटयाची चोरी घडयाळाच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली आहे.त्यानुसार खारघर पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. 

महत्त्वाची बातमी :  नवी मुंबईच्या माजी महापौरांनी केला ‘हा’ गौप्यस्फोट; संतापले नगरसेवक

याचवेळी सदर चोरटयाने कॅश काऊंटरवरील कर्मचारी रुपाली हिची नजर चुकवून कॅश काऊंटरवरील गल्ल्यात हात टाकून त्यातील 14 हजार 889 रुपये चोरुन पलायन केले.दरम्यान,रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करण्यापुर्वी दुकानातील मॅनेजर विद्या हिने दुकानातील दैनंदिन व्यवहाराचा हिशेब केला असता, त्यात 14 हजार 880 रुपयांची रोकड कमी असल्याचे तिच्या लक्षात आले होते. 

महत्त्वाची बातमी : कर्जमाफी लवकरचं होणार..! अजित पवार यांची ग्वाही  

या बाबतची महिती तिने मालक करण गुरुसंग यांना फोनद्वारे दिली होती.मात्र 13 डिसेंबर रोजी दुकान बंद असल्यामुळे दुसऱयादिवशी मालकाने दुकानात जाऊन दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता,12 डिसेंबर रोजी सुट्टे पैसे देण्याच्या बहाण्याबे आलेल्या चोरटयाने दुकानातील कॅश काऊंटरवरील कर्मचारी रुपाली ही दुसऱ्या कामात व्यस्त असल्याचे पाहून त्याने थेट दुकानातील कॅश काऊंटरमध्ये हात टाकून त्यातील 14 हजार 880 रुपयांची रोख रक्कम चोरल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार करण गुरुसंग यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सदर चोरटयावर गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. 

WebTitle : panvel man looted 14 thousand 880 rupees from the counter of a shop


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: panvel man looted 14 thousand 880 rupees from the counter of a shop