esakal | BIG NEWS - मुंबईतील धारावी पॅटर्न आता संपूर्ण राज्यात राबवला जाणार...
sakal

बोलून बातमी शोधा

BIG NEWS - मुंबईतील धारावी पॅटर्न आता संपूर्ण राज्यात राबवला जाणार...

वांद्रे कुर्ला संकुलातील कोविड केंद्राच्या ई उद्घटनाच्या वेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मालेगाव आणि धारावीत ट्रॅकिंग आणि टेस्टिंगचा प्रयोग यशस्वी झाल्याचे नमुद केले

BIG NEWS - मुंबईतील धारावी पॅटर्न आता संपूर्ण राज्यात राबवला जाणार...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : धारावी सारख्या दाट वस्तीतील कोविड संक्रमणावर नियंत्रणात आणण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे. आता हाच प्रयोग संपुर्ण राज्यात राबविण्याचे संकेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिलेत.

धारावीची लोकसंख्या 6 लाखावर असून स्थालांतरीत कामगार मिळून ही संख्या 8 लाख 50 हजारावर जाते. यातील 6 लाखाहून अधिक नागरीकांची पालिकेने प्राथमिक तपासणी केली. त्यात संशयीत 7 हजारहून अधिक संशयीत रुग्णांची चाचणी करुन त्यातील कोविड बाधित रुग्णांवर उपचार संपर्कातील व्यक्तींचे क्वारंटाईन करण्यावर भर देण्यात आला. तसेच सार्वजनिक स्वच्छता गृह, परीसराचे निर्जंतुकीकरणावर भर देण्यात आला. या मायक्रो लेव्हल नियोजन करण्यात आले होते. 

मोठी बातमी - वैद्यकीय परिक्षा रद्द करा; अन्यथा आरोग्यसेवा कोलमडण्याची शक्यता... वाचा सविस्तर...

याच धर्तीवर आता मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्ये कोविड प्रतिबंध उपाय केले जाणार आहेत. रुग्ण पालिकेकडे येण्यापुर्वी वैद्यकिय पथक त्यांच्यापर्यंत पेहचण्यावर आता भर दिला जाईल. 

वांद्रे कुर्ला संकुलातील कोविड केंद्राच्या ई उद्घटनाच्या वेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मालेगाव आणि धारावीत ट्रॅकिंग आणि टेस्टिंगचा प्रयोग यशस्वी झाल्याचे नमुद केले. त्यानुसार राज्यातील इतर भागांमध्येही आता कोविड प्रकिबंधाचे उपाय केले जाण्याची शक्यता आहे. 

now dharavi covid pattern will be used in rest of maharashtra

loading image
go to top