परिसर सील झालाय, घरात दोघेच वयस्कर, तातडीने औषधं हवी आहेत...

समीर सुर्वे
Tuesday, 14 April 2020

परिसर सील झालाय. घरातील दोघेच ज्येष्ठ नागरिक आहेत. तातडीने औषधं हवी आहेत... आता काळजी करण्याचे कारणच नाही; कारण ड्रोन तुमच्या घरापर्यंत औषधे पोहोचवणार आहे. 

मुंबई, ता. 14 : परिसर सील झालाय. घरातील दोघेच ज्येष्ठ नागरिक आहेत. तातडीने औषधं हवी आहेत... आता काळजी करण्याचे कारणच नाही; कारण ड्रोन तुमच्या घरापर्यंत औषधे पोहोचवणार आहे. 

ड्रोनद्वारे घरपोच औषधे पोहोचवण्याची तयारी काही जणांनी दाखवली आहे. महापौर किशोरी पेडणेकर या योजनेवर विचार करत आहेत. महापालिका प्रशासनाशी चर्चा करून लवकरच अंतिम निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या वाचा : 

लॉकडाऊनमध्येही Tata Motors ने सुरु केली गाड्यांची विक्री; टाटा मोटर्सची एक नंबर आयडिया...

समुद्रातील लाल 'शेवाळ'पासून तयार होणार कोरोनाचं औषध? या भारतीय कंपनीकडून शोध सुरु
 

मुंबईत हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना रोज वेगवेगळी औषधे लागतात. कोरोनाचे रुग्ण आढळलेली 381 ठिकाणे सील करण्यात आली आहेत. लॉकडाऊनमुळे परिसरातील दुकानांतून औषधे मिळणे कठीण झाले आहे. एकटेच राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची तर मोठी अडचण होत आहे. दरम्यान, सील केलेल्या काही भागांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर सुरू केला आहे. 

मुंबईतील स्थितीचा आढावा घेण्यासाठी फिरत असताना औषधे मिळण्याची अडचण जाणवली. महापालिकेमार्फत सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी ड्रोनने औषधे पोहोचवण्याचा विचार पुढे आला. - किशोरी पेडणेकर, महापौर

now drones will be used for delivery of medicines in mumbai read full report


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now drones will be used for delivery of medicines in mumbai read full report