esakal | लॉकडाऊनमध्येही Tata Motors ने सुरु केली गाड्यांची विक्री; टाटा मोटर्सची एक नंबर आयडिया...
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाऊनमध्येही Tata Motors ने सुरु केली गाड्यांची विक्री; टाटा मोटर्सची एक नंबर आयडिया...

व्हर्च्युअल शोरूम, ऑनलाईन पेमेंट!  टाटा मोटर्सच्या वाहनांची विक्री सुरू 

लॉकडाऊनमध्येही Tata Motors ने सुरु केली गाड्यांची विक्री; टाटा मोटर्सची एक नंबर आयडिया...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनामुळे देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या समस्येवर उपाय शोधून टाटा मोटर्सने वाहनांची विक्री सुरू केली आहे. संभाव्य ग्राहकांना संगणकावरील "व्हर्च्युअल शोरूम'मध्ये वाहने दाखवणे आणि बुकिंगसाठी ऑनलाईन पेमेंट करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विक्री केलेल्या वाहनांचा ताबा परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतरच दिला जाईल. 

मोठी बातमी - समुद्रातील लाल 'शेवाळ'पासून तयार होणार कोरोनाचं औषध? या भारतीय कंपनीकडून शोध सुरु

टाटा मोटर्सने देशातील 750 विक्री केंद्रांमार्फत ही व्यवस्था केली आहे. वाहनविक्री क्षेत्रात वर्षभरापासून मंदीचे वातावरण असून, त्यात कोरोना आणि लॉकडाऊनने भर घातली आहे. अशा वातावरणात टाटा मोटर्सने वाहनविक्रीसाठी अनोखा पर्याय शोधला आहे. करण्यासाठी घरबसल्या संकेतस्थळावर नोंदणी करून प्रवासी वाहन पर्यायावर क्‍लिक करावे लागेल. त्यानंतर ग्राहकांना आपल्या पसंतीचे वाहन निवडण्यासाठी टाटाचे व्हिडीओ ब्रोशर मदत करेल. या आभासी दुकानातून हव्या त्या प्रकारचे वाहन निश्‍चित करता येईल. वाहनात बदल हवा असल्यास "फॅक्‍टरी कस्टमायझेशन' पर्यायही आहे. 

मोठी बातमी - लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांसाठी राबताहेत हजारो हात

बुकिंगची रक्कम ऑनलाईन भरल्यावर मागणी निश्‍चित झाल्याचा (ऑर्डर कन्फर्मेशन) ई-मेल ग्राहकाला पाठवला जाईल. त्यानंतर वाहनकर्ज, सवलती आणि "एक्‍स्चेंज ऑफर्स' अशी माहिती दिली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया ई-मेल, व्हॉट्‌सऍप, व्हिडीओ कॉल आदी माध्यमांतून होईल. लॉकडाऊन उठल्यावर ग्राहकांना शोरूममध्ये जाऊन वाहन आणता येईल किंवा घरपोच मिळण्याचा पर्याय स्वीकारता येईल, असे टाटा मोटर्सतर्फे सांगण्यात आले.

tata motors to use unique idea for the sale of cars during lockdown

loading image
go to top