पालघरच्या मच्छीमाराचं नशीब फळफळलं, घोळ मासा बनवणार कोट्यधीश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरच्या मच्छीमाराचं नशीब फळफळलं, घोळ मासा बनवणार कोट्यधीश

पालघरच्या मच्छीमाराचं नशीब फळफळलं, घोळ मासा बनवणार कोट्यधीश

मनोर: खोल समुद्रात मासेमारी (fishing) करणाऱ्या मच्छिमारांचा रोजचा दिवस सारखा नसतो. मे महिन्यात तोक्ते चक्रीवादळात (cyclone) पालघर तालुक्यातील (palghar tehsil) मच्छिमार होरपळून निघाला होता. त्यानंतर स्वतःला सावरून हंगामाच्या मासेमारीसाठी तयारी करून खोल समुद्रात (sea) मासेमारीसाठी निघाले होते. मासेमारी दरम्यान पालघर तालुक्यातील मुरबे गावातील हरबा देवी बोटीचे मालक चंद्रकांत तरे यांचे नशीब फळफळले आहे.

त्यांच्या बोटीच्या 'वागरा' जाळ्यात तब्बल दीडशेहुन अधिक घोळ जातीचे मासे लागले आहेत. एका माश्याचे वजन साधारणपणे 18 ते 25 किलो आहे. मासे आणि माश्यात आढळणाऱ्या पिशवीच्या (बोत)विक्रीतून मच्छिमाराला तब्बल दीड कोटी रुपयांची कमाई होणार आहे.

हेही वाचा: तालिबानने मान्य केलं भारताचं महत्त्व आणि म्हटलं....

मुरबे गावातील मच्छिमार चंद्रकांत तरे त्यांच्या हरबा देवी नामक छोट्या बोटीने मुरबे बंदरातून समुद्रात 15 नॉटिकल मैल अंतरावर मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी करीत असताना समुद्रात लावलेले 'वागरा'जाळे जड झाल्याचे बोटीवरील कामगारांना जाणवले होते. जाळे ओढून बोटीत घेतल्यानंतर जाळ्यात दीडशे हुन अधिक घोळ मासे आढळून आले. एक मासा साधारणपणे 18 ते 25 किलो वजनाचा आहे. एका माश्यातून 700 ग्रॅम ते एक किलो ग्रॅमची पर्यंत पिशवी (बोत) मिळण्याची शक्यता असते. पिशवीचा (बोत)वापर औषधी वापर केला जात असल्याने चांगला भाव मिळतो.

हेही वाचा: अनिल परबांचे निकटवर्तीय अधिकारी खरमाटे यांच्यावर ईडीचा छापा

घोळ मासा स्वादिष्ट असून अनेक औषधी गुणधर्म असल्याने घोळ माश्याला विशेष महत्व आहे. घोळ माश्यात आढळणाऱ्या कोलेजनच वापर वैद्यकीय कारणास्तव केला जातो. त्यामुळेच घोळ माश्याला चांगली किंमत मिळते.घोळ मासा साधारणपणे सिंगापूर,मलेशिया, इंडोनेशिया आणि हाँगकांग आदी ठिकाणी निर्यात केला जातो.घोळ जातीच्या सर्वात लहान माशाची किंमतही आठ ते दहा हजारांच्या घरात असते.

सोमवारी सकाळी व्यापाऱ्यांकडून घोळ मासे दीड कोटी हुन अधिक किमतीत खरेदी करण्यात आले आहेत.

घोळ मासा खोल समुद्रात ठराविक ठिकाणी दिर्घ काळाने आढळतो.परंतु नशिबाने जाळ्यात लागल्यावर मच्छिमारांना लाखांची कमाई करून देत असल्याची माहिती स्थानिक मच्छिमार आणि मुरबे गावचे सरपंच राकेश तरे यांनी दिली

Web Title: Now Ghol Fish Will Make Palghar Fisherman Crorpati

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :palghar