Notebook in Books: आता पुस्तकांमध्येच लिहिण्याची सोय! विद्यार्थ्यांची होणार वह्यांपासून सुटका

पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Balbharati
Balbharatisakal
Updated on

मुंबई : आता पुस्तकांमध्येच वह्यांची पान देण्याचा निर्णय पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं घेतला आहे. इयत्ता तिसरी ते दहावीच्या पुस्तकांमध्ये हा बदल केला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून हा निर्णय लागू होणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांची आता वह्या वापरण्याची गरजच पडणार नाही. (Now Notebook will be in Books Students will be freed from notebooks)

Balbharati
Dhangekar on Chandrakant Patil : "चंद्रकांतदादा मी रवी धंगेकर"; विजयानंतर हात जोडून दिलं प्रत्युत्तर

या नव्या निर्णयानुसार, आता तिसरी ते दहावीपर्यंतची पाठ्यपुस्तकं चार भागात विभागली जाणार आहेत. प्रत्येक धड्यामागे आणि प्रत्येक कवितेमागं एक वहीचं पान असणार आहे. यामध्ये विद्यार्थी धडा शिकत असतानाच काही नोट्स घेऊ शकणार आहेत. त्यामुळं विद्यार्थी जेव्हा शाळेत येतील तेव्हा त्यांच्या दप्तरात वह्या आणण्याची गरज पडणार नाही. केवळ हे पुस्तकचं घेऊन त्यांना येता येईल. पुढील वर्ष २०२३ ते २०२४ या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.