
Dhangekar on Chandrakant Patil : "चंद्रकांतदादा मी रवी धंगेकर"; विजयानंतर हात जोडून दिलं प्रत्युत्तर
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना शांतपणे प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांतदादांनी कोण धंगेकर? असा प्रश्न केला होता. त्यावर त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे.

धंगेकर म्हणाले, मला सर्वांनी सहकार्य केलं. शेवटचा कार्यकर्ता हा 'तन-मन-धन असं काम करत होता. सगळे दिवस रात्र झटले, शिवसेना देखील माझ्यासाठी झटली. त्यांचं मुख्यमंत्रीपद भाजपानं कुरघोडी करुन पाडलं. त्याचा राग लोकांच्या मनात होता, तोच राग लोकांनी व्यक्त केला आहे.
सगळ्या लोकांना न्याय द्यायचं काम आम्ही करु. पवार साहेबांनी देखील माझ्यासाठी ३ प्रचार सभा घेतल्या. पवार साहेबांच्या घरचं आणि आमचं नातं आहे. अजित पवारांचा फोन आला आणि त्यांनी सांगितल की माध्यमांशी बोलताना खूप वेगानं बोलू नकोस, असा किस्साही त्यांनी सांगितला.
हे ही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
दरम्यान, कोण धंगेकर? असं म्हणतं चंद्रकांत पाटलांनी धंगेकरांना हिणवलं होतं. पण विजयानंतर धंगेकर फक्त हात जोडून म्हणाले, चंद्रकांतदादा मी रवी धंगेकर. खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयाबाहेर माझे बॅनर म्हणजे कार्यकर्त्यांचा उत्सव. मी बापट साहेबांना भेटायला जाणार त्यांचा आशीर्वाद घेणार. कसब्यात पैशाचा धूर झला आणि भाजपा-शिंदे सरकार जळून खाक झालं, असंही धंगेकर यावेळी म्हणाले.