आता शिवडी रुग्णालयात औषध प्रतिरोध क्षय चाचणी शक्य; BMC अद्यावत प्रयोगशाळा उभारणार

आता शिवडी रुग्णालयात औषध प्रतिरोध क्षय चाचणी शक्य; BMC अद्यावत प्रयोगशाळा उभारणार
Updated on


मुंबई  : शिवडी येथील महानगर पालिकेच्या क्षयरोग रुग्णालयात औषध प्रतिरोध क्षयाची चाचणी करणे शक्‍य होणार आहे. यासाठी महानगर पालिका अद्यावत प्रयोग शाळा उभारत आहे. या प्रयोगशाळेमुळे प्रतिरोधक क्षयाच्या रुग्णांवर तत्काळ उपचार करणे शक्‍य होणार आहे. मुंबईत दरवर्षी औषधाला दाद न देणाऱ्या 4 हजार क्षयरोग रुग्णांची नोंद होते.

क्षया रोगावरील उपचार अर्धवट सोडल्यास वारंवार क्षयाची बाधा होता.कालांतराने नियमीत औषध उपचाराला क्षयाचे जंतू दाद देत नाही.अशा औषध प्रतिरोधक क्षयरोगावर उपचार करण्यासाठी विशिष्ट पध्दतीची औषध वापरावी लागतात.मात्र,औषध प्रतिरोधक क्षय आजाराची वेळीच चाचणी होणे गरजेचे आहे.त्यासाठी महापालिका शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात औषधांची संवेदनशीलता चाचणी आणि आजाराच्या व्यवस्थापनासाठी क्षयरोग जंतूची आवश्‍यक गुणवत्ता नियंत्रित कृत्रिम वाढ याच्या चाचण्या करण्यात येणार आहे.त्यासाठी जुनी प्रयोगशाळा अद्यावत करण्यात येणार असून त्या प्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी मंजूरी दिली आहे.चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयातही अशा प्रकारचे प्रयोग शाळा तयार करण्यात येणार आहे.त्यासाठी महापालिका 2 कोटी 28 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

मुंबईत सर्वाधिक रुग्ण
जगाच्या आणि भारताच्या तुलनेने मुंबईत औषधाला प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे.मुंबईत अशा क्षयाचे दरवर्षी 4 हजार रुग्ण नोंदवले जातात.तर,क्षयाचे एकुण रुग्ण 23 ते 25 हजारा दरम्यान आहे.तर,महाराष्ट्रात 2 लाखाहून अधिक रुग्ण आहे.म्हणजे,राज्यातील 20 ते 25 टक्के रुग्ण एकट्या मुंबईत नोंदवले जातात.डिसेंबर महिन्यात झालेल्या विशेष मोहीमे अंतर्गत मुंबईत 9 हजार 619 संशयीत रुग्ण आढळले होते.त्यातील 499 जणांना क्षयाची बाधा झाल्याचे आढळले आहे.मागील काही वर्षाच्या तुलनेने हे प्रमाण घटले आहे.मात्र,मानखुर्द,गोवंडी,कुर्ला,धारावी या भागात क्षयाचे सर्वाधिक रुग्ण आढळतात.

Now possible medicine resistance tuberculosis test at Shivdi Hospital BMC will set up an updated laboratory

-----------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com