esakal | अकरावीच्या CETची वेबसाईट बंद; विद्यार्थी हैराण
sakal

बोलून बातमी शोधा

online exam

अकरावीच्या CETची वेबसाईट बंद; विद्यार्थी हैराण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CET) नोंदणीसाठी सुरू करण्यात आलेली वेबसाईट चालत नसल्याने विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली आहे. काल दिवसभर ही वेबसाइट बंद असतानाच आजसुद्धा ती चालत नसल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत. (now the website of the 11th CET is closed down aau85)

हेही वाचा: बारावीचे गुण भरण्याची वेबसाईट 'हँग'; सर्व्हर डाऊन, शिक्षक हैराण

दोन दिवसांपासून सुरू झालेल्या CETच्या वेबसाईट संदर्भात शालेय शिक्षण विभाग गांभीर नसल्याचा आरोप विद्यार्थी, राजकीय संघटनांकडून करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात परिस्थिती सुधारली नाहीतर या विषयी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जाईल, असा इशारा प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी दिला आहे. CETची वेबसाईट सुरळीत व्हावी म्हणून त्या संदर्भातील कामकाज सुरू आहे. काही तांत्रिक अडचणी असून त्यात लवकरच सुधारणा होतील, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी 'सकाळ' शी बोलताना दिली.

हेही वाचा: जोपर्यंत 70 टक्के लसीकरण नाही, तोपर्यंत लोकल प्रवास नाही - मुंबई पालकमंत्री

राज्यभरात अकरावीच्या प्रवेशासाठी 21ऑगस्ट रोजी CET आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठीची नोंदणी 26 जुलैपर्यंत चालणार असून मागील दोन दिवसात ही वेबसाईट चालत नसल्याने विद्यार्थ्यांना याचा मनस्ताप सोसावा लागत आहे. दरम्यान, काल सुरुवातीला काही वेळ ही वेबसाईट चालल्याने रात्री 8.30 वाजेपर्यंत सुमारे एक लाख 30 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर पहिल्या दिवशी तांत्रिक अडचणी घेऊन सुरू झालेली ही प्रक्रिया दुसर्‍या दिवशीही कायम राहिली. त्यामुळे आज काही वेळात रात्री उशिरा 16 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

मुंबई विभागात केंद्राच्या अडचणी

मुंबई विभागात अर्ज करत असताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडताना मुंबई सब 1आणि मुंबई सब 2 असे दोन पर्याय येतात यातून विद्यार्थ्याने एक पर्याय निवडला की त्यातील वॉर्ड येतात. मात्र, मुंबई महापालिकेची वॉर्ड रचना आणि मुंबई शिक्षण विभागाची वॉर्ड रचना यामध्ये खूप फरक असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ होत आहे. ‘पी नॉर्थ’मध्ये राहणाऱ्या एका पालकाने अर्ज भरताना तोच वॉर्ड निवडला. मात्र अर्ज सबमिट झाल्यानंतर ‘एन वॉर्ड’ दाखवण्यात येत आहे. यामुळे आता या विद्यार्थ्याला लांबचा प्रवास करून परीक्षा केंद्रावर पोहचावे लाणार आहे. अशीच अडचण अनेक मुलांची होत आहे. त्यातच एकदा फॉर्म सबमिट केल्यावर पुन्हा अर्ज संपादीत करण्याची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तरी याबाबत शिक्षण विभागाने योग्य ती दखल घ्यावी अशी मागणी विद्यार्थी संघटनानी केली आहे.

loading image