esakal | बारावीचे गुण भरण्याची वेबसाईट 'हँग'; सर्व्हर डाऊन, शिक्षक हैराण
sakal

बोलून बातमी शोधा

hsc result

बारावीचे गुण भरण्याची वेबसाईट 'हँग'; सर्व्हर डाऊन, शिक्षक हैराण

sakal_logo
By
युगंधर ताजणे

पुणे - दहावी परीक्षेच्या निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी सुरू करण्यात असलेल्या सीईटी नोंदणीची वेबसाईट क्रॅश झाल्याचे उदाहरण ताजे असताना आता बारावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन भरण्याची वेबसाईटचे सर्व्हर डाऊन झाल्याने शिक्षक हैराण झाले आहेत. अनेक शिक्षकांचा मनस्ताप वाढला आहे. अनेकांना त्यामुळे गुण अपलोड करण्यास अडचणी येत असल्याचे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनांकडून सांगण्यात आले. (hsc result website crash due to server down the big problem infront of teacher yst88)

बारावीचे गुण भरण्याची वेबसाईट -

वेबसाईट अत्यंत संथगतीने सुरू असल्याने हैराण झालेल्या शिक्षकांना रात्रभर आपल्या कॉलेजात मुक्काम करून विद्यार्थ्यांचे गुण भरावे लागत आहेत. बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया 23 जुलैला संपणार असून वेबसाईटच्या गोंधळामुळे ही मुदत वाढवून देण्याची मागणी शिक्षक करीत आहेत.

मंगळवारी संध्याकाळपासून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची संगणकीय प्रणाली खंडित झाली. ती बऱ्याच उशिराने म्हणजे आज बुधवारी दुपारी सुरू झाली. माञ वेबसाईट अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे शिक्षकांना गुण अपलोड करताना मनस्ताप सोसावा लागत आहे. राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असताना, वाहतुकीची साधने नसताना, निकालाचे काम करण्यासाठी बारावीचे शिक्षक शाळा, महाविद्यालयात उपस्थित होते. परंतु सर्व्हर डाऊन झाल्याने या शिक्षकांना नुसते बसून रहावे लागत आहे.

हेही वाचा: राज्यात होम क्वारंटाईन व्यक्तींच्या संख्येत लक्षणीय घट

हेही वाचा: पेगॅसस प्रकरणाची SCच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी - काँग्रेस

मुंबईतील काही महाविद्यालयात तर शिक्षक रात्रभर थांबले होते, पण सर्व्हर डाऊन झाल्याने कोणतीच माहिती अपलोड होऊ शकली नसल्याने शिक्षकांचा मनःस्ताप वाढला असल्याचे सांगण्यात आले.

loading image