Power Plant in Maharashtra : एनटीपीसी आणि महाप्रीत यांच्यात 'हायब्रीड एनर्जी पार्क' साठी करार!

NTPC : राज्यात दहा हजार मेगावॉट क्षमतेचे सौर-पवन ऊर्जा प्रकल्प ; कोळसा टंचाई आणि पाण्याच्या कमतरतेवर मात!
राज्यात उभारणार हायब्रीड एनर्जी पार्क
राज्यात उभारणार हायब्रीड एनर्जी पार्कesakal

Thermal Plant : नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन (एनटीपीसी) राज्‍यात ग्रीन एनर्जी ‘हायब्रीड एनर्जी पार्क’ उभारणार आहे. या हायब्रीड एनर्जी पार्कमध्ये तब्बल दहा हजार मेगावॉट क्षमतेचे एकत्रित सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प असणार आहेत. त्यासाठी एनटीपीसीने महात्मा फुले रिन्यएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी (महाप्रीत) या राज्य सरकारच्या कंपनीसोबत करार केला आहे.

राज्यात उभारणार हायब्रीड एनर्जी पार्क
Solar Energy Generation : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

राज्याच्या विजेच्या मागणीत झपाट्याने वाढ होत असली तरी औष्णिक वीज प्रकल्पातून कोळसा टंचाईमुळे वीज निर्मितीवर मर्यादा येत आहेत. तसेच अपुऱ्या पाण्यामुळे जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मिती करताना हात आखडता घ्यावा लागत आहे.

त्या पार्श्वभूमीवर वीज कंपन्यांकडून सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीवर भर दिला जात आहे. त्यानुसार महाप्रीतने एनटीपीसीच्या मदतीने हायब्रीड वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे १० हजार मेगावॉट क्षमतेचे हे प्रकल्प असणार आहेत. तसेच येथे तयार होणारी वीज स्टेट ग्रीडच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवता येणार आहे.

राज्यात उभारणार हायब्रीड एनर्जी पार्क
Repos Energy Founder: ऊर्जा क्षेत्रातील बदलाची प्रणेती अदिती भोसले-वाळुंज

२५ हजार एकर जमिनीची आवश्यकता

एनटीपीसी आणि महाप्रीत सुमारे दहा हजार मेगावॉटचे एकत्रित सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. त्यानुसार पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी जास्त जागा लागत नसली तरी एक मेगावॉटच्या सौर प्रकल्पासाठी पाच एकर जमीन लागते. त्यामुळे हायब्रीड प्रकल्पांतर्गत पाच हजार मेगावॉटचे सौर प्रकल्प उभारण्यासाठी किमान २५ हजार एकर जमिनीची आवश्यकता आहे. त्याच जागेत पवन ऊर्जा प्रकल्पांच्या पवन चक्क्या उभारून वीज निर्मिती करणे शक्य होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com