नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय; वाचा आजची आकडेवारी

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 29 April 2020

  • नव्या 18 रुग्णांमुळे बाधितांचा आकडा 206वर;
  • गर्भवती महिलांचा समावेश जास्त

नवी मुंबई: शहरातील कोरोनाबाधित रुग्णांनी 200 संख्या पार केली आहे. आज दिवसभरात 18 रुग्ण सापडल्यामुळे नवी मुंबईतील रुग्णांचा आकडा 206 झाला आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये गर्भवती महिलांचा सर्वाधिक समावेश आहे. तर एका ठिकाणी बेस्ट बसच्या वाहकाला कोरोना लागण झाली आहे.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला बुधवारी 98 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 18 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले. अहवालात दिलेल्या माहितीनुसार दोन गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एका गर्भवती महिलेची प्रसूतीनंतर तपासणी केली असता, ती कोरोनाबधित असल्याचे निष्पन्न झाले. एपीएमसी मार्केटच्या दाना मार्केटमध्ये काम करणाऱ्या 3 युवकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे तिघेही एका कोरोनाबधित सॉफ्टवेअर अभियंत्याच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना संसर्ग झाला आहे.

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

शीव रुग्णालयात काम करणाऱ्या एका परिचारीका आणि एका आयाला कोरोनाची लागण झाल्याने शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोपरखैरणे सेक्टर 19 येथील रहिवासी असणारे देवनार बस आगारात बेस्ट बसचे वाहक यांच्या सहकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यावर त्यांची टेस्ट केली असता ते कोरोनाबधित झाले आहेत.

Big Breaking - 'लीलावती'मधील प्लाझ्मा थेरपी यशस्वी, राजेश टोपे यांची माहिती

अवघ्या पाच दिवसांत कोरोनाची शंभरी
कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने अवघ्या पाच दिवसांत शंभरी पार केली. 25 एप्रिलला 5 रुग्णांची नोंद झाल्यावर 26 एप्रिलपासून वाढ होण्यास सुरुवात झाली. 26 तारखेला 23 रुग्ण, त्यानंतर 27 ला 14 रुग्ण सापडले. परंतू 28 एप्रिलला कोरोनाचा भडका उडाला. या दिवशी तब्बल 43 रुग्ण सापडले. त्यानंतर आज 29 एप्रिलला 18 रुग्ण आढळले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of casualties due to 18 new patients has risen to 206 in navi mumbai ; Including pregnant women