काळजी घ्या! मुंबईतील दैनंदिन पॉझिटिव्हीटी दरात वाढ, वाचा सविस्तर बातमी

काळजी घ्या! मुंबईतील दैनंदिन पॉझिटिव्हीटी दरात वाढ, वाचा सविस्तर बातमी

मुंबई: मुंबईतील कोरोना बाधित रुग्णसंख्येत दररोज भर पडत आहे.  पॉझिटिव्ह दर 5 टक्क्यांवर पोहोचला आहे. चाचण्यांची संख्या ही वाढवण्यात आली असून दिवसाला सुमारे 18 हजाराच्या आसपास चाचण्या केल्या जात आहेत.

मुंबईत 1 मार्चला 18 हजार 469 चाचण्या करण्यात आल्या. त्यातील 4.8 टक्के अँटीजेन तर 13.6 टक्के आरटी-पीसीआर चाचण्यांचा समावेश होता. पॉझिटिव्हीटी दर 5 टक्के इतका होता. 

एक महिन्यांपूर्वी 1 फेब्रुवारीला मुंबईत 13 हजार 689 चाचण्या करण्यात आल्या. त्यात 4.1 अँटीजेन तर  8.2 आरटी-पीसीआर चाचण्यांचा समावेश होता. पॉझिटिव्हीटी दर 4 टक्क्यांच्या आसपास होता. 

नवीन रुग्णांसह ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा देखील वाढत आहे. 1 फेब्रुवारीला ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा 5 हजार 656 इतका होता. महिन्याभरात त्याच्यात वाढ होऊन तो आता 9 हजार 690 वर पोहोचला आहे. मृत्यूचा दर मात्र 4 टक्के आहे. 

बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र वाढताना दिसत आहे. 1 फेब्रुवारीला 460 रुग्ण बरे झाले होते तर 1 मार्चला 876 रुग्ण बरे झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा महिन्याभरात दुपटीने वाढल्याचे दिसते. गेल्या महिन्याभरात बरे होणाऱ्या रुग्णांचा ही सर्वात मोठी संख्या आहे.

राज्यात काल 7863 रुग्णांची भर पडली असून दैनंदिन रुग्णांमध्ये 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 21 लाख 69 हजार 330 वर पोहोचला आहे. मृत्यूदर 2.41 इतका आहे. राज्यातील मृत्यूदर नियंत्रणात असून दैनंदिन रुग्णसंख्या मात्र वाढत आहे.

मुंबईसह राज्यात रुग्णवाढ होत असली तरी घाबरण्याचे कारण नाही. दैनंदिन आकडे हे वर - खाली होत असून त्यात अनियंत्रित वाढ दिसत नाही. त्यामुळे ही दुसरी लाट नाही. रुग्णांची दैनंदिन संख्या सतत 10 दिवस 1 हजाराच्या वर गेली तर त्याला आपण दुसरी लाट म्हणू शकतो.
डॉ. गौतम भन्साली , खासगी रुग्णालयांचे समन्वयक
-----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Number corona infected patients Mumbai increasing daily positive rate reached 5 percent

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com