कारागृहांमध्येही कोरोनाचे थैमान! बाधित कैद्यांचा आकडा वाचून तुम्हालाही बसेल धक्का

अनिश पाटील
Sunday, 16 August 2020

राज्यातील कारागृहांमधील कोरोनाग्रस्त कैद्यांचा आकडा  एक हजारांच्या वर गेला आहे. आतापर्यंत 1007 कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून सहा कैद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबई : राज्यातील कारागृहांमधील कोरोनाग्रस्त कैद्यांचा आकडा  एक हजारांच्या वर गेला आहे. आतापर्यंत 1007 कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून सहा कैद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नागपूर कारागृहात सर्वाधीक कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या पाठोपाठ मुंबईतील आर्थर रोड कारागृहात कोरोनाग्रस्त कैद्यांचा आकडा सर्वाधीक आहे.  राज्यातील कारागृहांमधील कोरोनाग्रस्त कैद्यांचा आकडा शुक्रवारी 1007 वर पोहोचला आहे. त्यातील 814 कैदी उपचारानंतर बरे झाले असून उर्वरीत कैद्यांना अद्याप उपचार सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली.  

नोकरीवरचं विघ्न 'विघ्नहर्त्यानेच' टाळलं, तरुणांनी असा केला व्यवसायाचा 'श्रीगणेशा'

नागपूर मध्यवर्ती कारागृहात आतापर्यंत सर्वाधीक म्हणजे 219 कैद्यांना कोरनाची लागण झाली आहे. त्या पाठोपाठ मुंबईतील आर्थररोड कारागृहात 182 कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. सांगली व अकोल्यातील कारागृहामध्ये अनुक्रमे 145 व 99 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  दुसरीकडे राज्यात सहा कैद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेत. कोरोनामुळे कैद्यांचा मृत्यू झालेल्या कारागृहांमध्ये  नवी मुंबईतील तळोजा कारागृहा येरवडा, धुळे, अमरावती जिल्हा कारागृहाचा समावेश आहे.

...अन् स्वातंत्र्यदिनी पाटोळ ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण थांबली; जलजीवन मिशनद्वारे थेट नळजोडणी

देशातील संवेदनशील कारागृहांपैकी एक असलेले आर्थररोड कारागृहात गँगस्टर्स व आर्थिक गुन्ह्यांतील आरोपी आहे. आर्थर रोड कारागृहात सर्व प्रथम कोरोनाचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर राज्य भरातील कारागृहांमध्ये सहा हजार 177 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. आर्थर रोड कारागृहातील 781 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. आर्थर रोड कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. 800 कैद्यांची क्षमता आसलेल्या आर्थर रोड कारागृहात 2500 अंडरट्रायल कैदी होते. आर्थर रोड पाठोपाठ नागपूर येथील 616, अकोल्यातील 569, औरंगाबादेतील 517 व येरवडा कारागृहातील 506 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील कारागृहांमधील 293 कर्मचा-यांनाही कोरोनाची लागण झाली आहे

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona patient prisoners in the states jails has crossed one thousand