नवी मुंबई रेड झोन अधिक गडद; रुग्ण संख्या 300 पार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

शनिवार पर्यंत शहरात 39 रुग्ण सापडले होते. दोन दिवसांत 64 रुग्ण सापडले आहेत. परंतु आजच्या रुग्णांमुळे नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 314 पर्यंत गेला आहे. आणखीन काही चाचण्यांचे अहवाल येणार असून हा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. 
 

नवी मुंबई, ता. 3 : शहरातील कोरोनाबधितांच्या आकड्याने आज तिसरी सेंच्युरी पूर्ण केली. आज आलेल्या अहवालापैकी 25 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. शनिवार पर्यंत शहरात 39 रुग्ण सापडले होते. दोन दिवसांत 64 रुग्ण सापडले आहेत. परंतु आजच्या रुग्णांमुळे नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 314 पर्यंत गेला आहे. आणखीन काही चाचण्यांचे अहवाल येणार असून हा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. 
महापालिकेच्या आरोग्य विभागाला आज 307 अहवाल प्राप्त झाले. या अहवालापैकी 25 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक जास्त रुग्ण एपीएमसी मार्केटच्या आधीपासून बाधित असणाऱ्या रुग्णांपासून लागण झालेले रुग्ण आहेत.

महत्त्वाची बातमी ः कहर ! राज्यात आज 678 नवे कोरोनाबाधित, जाणून घ्या एकूण रुग्णसंख्या

एपीएमसीतील चार जणांना आज नव्याने कोरोनाची लागण झाली तर एपीएमसीत आधी पासून कोरोनाबधित असणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आज सापडलेल्या 25 रुग्णांपैकी नेरुळ आणि वाशी प्रत्येकी 9, तुर्भे,ऐरोली अनुक्रमे एक आणि कोपरखैरणेमध्ये पाच नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या नव्या रुग्णांबरोबरच शहरातील कंटेन्मेंट झोनच्या संख्येत वाढ झाली आहे. 
 

मोठी बातमी ः धारावीतील थैमान थांबेना! दादर-माहिमचा आकडाही वाढला

- पोलिसाला लागण 
रविवारी एपीएमसी पोलीस ठाण्यातील 31 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबची कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत डयुटीवर असलेल्या 8 पोलीस कर्मचाऱ्यांना क्कॉरंटाईन करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचीही पहिलीच घटना असल्याने नवी मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे. 
सानपाडा एमआयडीसी भागात राहाणारे 31 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल एपीएमसी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते एपीएमसीतील दाणा मार्केटमध्ये बंदोबस्तावर होते. शनिवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली होती. रविवारी त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्यासोबत डयुटीवर असलेल्या 8 पोलीस कर्मचाऱयांना कॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली. 

The number of corona patients has increased in Navi Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona patients has increased in Navi Mumbai