कहर ! राज्यात आज 678 नवे कोरोनाबाधित, जाणून घ्या एकूण रुग्णसंख्या

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

आज राज्यात 678 नवीन रुग्णांची नोंद झाली. आज 27 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी मुंबईत 21, पुण्यात 4 , भिवंडीत 1 आणि नवी मुंबईत एकाचा मृत्यू झाला आहे. 

मुंबई :  आज राज्यात 678 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या 12,974 झाली आहे. तसेच, आज 27 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी मुंबईत 21, पुण्यात 4 , भिवंडीत 1 आणि नवी मुंबईत एकाचा मृत्यू झाला आहे. 

हे ही वाचा  : Lockdown : 'साहेब, आम्हाला गावी जायचंय'..., आपत्ती व्यवस्थापन कक्षेत फोनचा खणखणाट

आज झालेल्या मृतांपैकी 16 पुरुष; तर 11 महिला आहेत. त्यात 60 वर्षे किंवा त्यावरील 14  रुग्ण आहेत; तर 10 रुग्ण हे 40 ते 59 वयोगटातील आहेत. 3 जण 40 वर्षांखालील आहे.  27 मृतांपैकी 13 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब,  हृदयरोग, असे अतिजोखमीचे होते. आतापर्यंत राज्यात 548 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 
राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 1,70,139 नमुन्यांपैकी 1,56,078 जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले; तर 12,974 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. केंद्र सरकारच्या विश्लेषणानुसार सध्या राज्यात दर दहा लाख लोकसंख्येमागे चाचणीचे प्रमाण 1237 एवढे आहे. हेच प्रमाण देशपातळीवर 803 आहे. 

नक्की वाचा  : लॉकडाऊन : गावी पाठवण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना राबविली जात आहे. राज्यात सध्या 997 कंटेनमेंट झोन क्रियाशील आहे. आज एकूण 11,078 सर्वेक्षण पथकांनी 51.05 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले.  

नक्की वाचा : कोरोना योद्धांना भारतीय हवाई दलाकडून अनोखी मानवंदना

आतापर्यंत 155 रुग्ण बरे
आज राज्यात 115 रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत 2115  रुग्ण कोरोनापासून पुर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यात 1,81,382 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13,158 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

678 new patients in the state 27 killed; Total affected at 12,974


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 678 new patients in the state 27 killed; Total affected at 12,974