जी उत्तरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच, प्रशासनाची चिंता वाढली

मिलिंद तांबे
Sunday, 27 September 2020

जी उत्तरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दररोज वाढत चालला आहे. जी उत्तरमध्ये शनिवारी 85 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली.

मुंबई : कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुंबई शहराला या व्हायरसचा बराच फटका बसला आहे. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. मात्र जी उत्तरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दररोज वाढत चालला आहे. जी उत्तरमध्ये शनिवारी 85 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली.

धारावीमध्ये शनिवारी दिवसभरात 14 नवीन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 3123 इतकी झाली आहे. तर 179 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  दादरमध्ये  48 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 3,455 इतकी झाली आहे. तर 530 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहिममध्ये शनिवारी 23 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 3115 इतकी झाली आहे. तर 505 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात शनिवारी 85 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 9,693 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 549 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.  धारावीमध्ये 2,662, दादरमध्ये 2,808 तर माहीममध्ये 2,502 असे एकूण 7,972 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1,214 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अधिक वाचाः  शिक्षकांच्या माथी अहवालाचे ओझे; ऑनलाइन शिक्षणाची माहिती देण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना

मुंबईत रूग्णवाढीचा दर 1.07 वर

मुंबईत शनिवारी 2,282 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,96,459 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.14 टक्क्यांवरून कमी होऊन 1.07 वर खाली आला आहे. मुंबईत शनिवारी 44 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 8,747 वर पोहोचला आहे. मुंबईत शनिवारी 1,942 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 81 टक्के इतका झाला आहे. 

अधिक वाचाः  मुंबईतील पिण्याचे पाणी सर्वाधिक शुद्ध; BMC चा पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल प्रसिद्ध

 मुंबईत शनिवारी नोंद झालेल्या 44 मृत्यूंपैकी 29 जणांना दीर्घकालीन आजार होते. शनिवारी एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 27 पुरुष तर 17 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 44 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 च्या काली होते.18 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 24 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते. काल दिवसभरात  1,942 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1,58,749 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर वाढून 65 दिवसांवर गेला आहे. 25 सप्टेंबर पर्यंत एकूण 10,70,623  कोविड चाचण्या करण्यात आल्या. 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.07  इतका आहे. 

----------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Number corona patients increased north of Mumbai administration became more concerned


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number corona patients increased north of Mumbai administration became more concerned