मुंबईतील पिण्याचे पाणी सर्वाधिक शुद्ध; BMC चा पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल प्रसिद्ध

समीर सुर्वे
Sunday, 27 September 2020

 पिण्याच्या पाण्याचे अवघे 0.7 टक्के नमूने 2019-20 या वर्षात मुंबईत दूषित आढळले आहेत. सर्वाधिक दूषित नमुने जी उत्तर प्रभाग म्हणजे दादर, माहिम आणि धारावीत (1.5 टक्के) आढळले आहेत.

मुंबई :  पिण्याच्या पाण्याचे अवघे 0.7 टक्के नमूने 2019-20 या वर्षात मुंबईत दूषित आढळले आहेत. सर्वाधिक दूषित नमुने जी उत्तर प्रभाग म्हणजे दादर, माहिम आणि धारावीत (1.5 टक्के) आढळले आहेत. त्या खालोखाल मलबार हिल, ग्ररॅन्टरोड डी प्रभागाच्या हद्दीत 1.4 टक्के नमूने दूषित आढळले आहेत. मलबार हिलमध्ये राज्यापाल, मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांची शासकीय निवासस्थाने आहे. गर्भश्रीमंतांची मोठी वस्तीही आहे. महापालिकेच्या पर्यावरण स्थिती दर्शक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 

तीन बड्या अभिनेत्रींच्या एनसीबी चौकशीबाबत आज दिवसभरात काय घडलं; एनसीबीला त्यांनी काय उत्तरे दिली?

शहर विभागात दूषित पाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या ठिकाणच्या 9 प्रभागांपैकी 5 प्रभागांमध्ये 1 टक्क्यांपेक्षा जास्त दूषित पाण्याचे नमूने आढळले आहेत. तर, पुर्व उपनगरातील सर्व 6 प्रभागातील 1 टक्क्या पेक्षा नमूने दुषित आढळले आहेत. पश्चिम उपनगरातील 9 पैकी दोन  प्रभागांमध्ये 1 टक्क्यांपेक्षा जास्त पाण्याचे दूषित नमूने आढळले आहेत.

सर्वात सुरक्षित पाणी ई विभागा म्हणजेच भायखळा, माझगाव आणि एफ उत्तर म्हणजेच दादर पुर्व, माटुंगा, शीव या भागात आढळले आहे. या ठिकाणी तपासण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 0.1 टक्के नमूने दूषित आढळले आहेत.

जी उत्तर प्रभागात जुन्या चाळी, बैठ्या घरांची संख्या मोठी आहे. त्याच बरोबर धारावी ही मोठी झोपडपट्टी आहे.  2018-19 मध्ये या प्रभागात तपासण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांपैकी 0.9 टक्के नमुने दूषित आढळले होते. तर डी प्रभागात गेल्या वर्षी 1.5 टक्के नमूने दूषित आढळले होते. मुंबईत दररोज जलकुभांसह विविध ठिकाणच्या 200 ते 250 पाण्याच्या नमुन्यांची तपासणी होते. तर पावसाळ्यात आणि दूषित पाण्याच्या तक्रारी वाढल्यास हे प्रमाण 300 ते 350 पर्यंत जाते असेही या अहवालात नमूद आहे. 2017-18 मध्ये तपासणी करण्यात आलेल्या पैकी 1 टक्के नमूने दूषित आढळले होते. 2018-19 मध्ये हे प्रमाण 0.7 टक्क्यांवर आले. तर 2019-20 मध्येही 0.7 टक्के नमूने दूषित आढळले आहेत.

उत्तर अरबी समुद्रात जपान-भारत नौदल कवायती; सहकार्य वाढवण्यासाठी तीन दिवसांचा कार्यक्रम 

1 टक्क्यांपेक्षा जास्त दूषित नमूने असलेले विभाग 
सॅन्डहस्ट रोड बी प्रभाग - 1.00
काळबादेवी,गिरगाव सी प्रभाग - 1.3 
ग्रॅन्टरोड मलबार हिल डी प्रभाग -1.4 
लालबाग परळ एफ दक्षिण प्रभाग - 1.2
दादर माहिम धारावी  - 1.5 
वांद्रे ,खार पश्चिम - 1.1 
गोरेगाव  पी दक्षिण - 1.2 
....
असे करतात पाणी पिण्यायोग्य 
 धरणातून पाणी उचलल्यावर पंपिंग स्टेशनमध्येच त्यावर प्राथमिक प्रक्रीया केली जाते. यात पांजारापोळ येथे 1365 दशलक्ष लिटर, भांडुप येथे 2810, विहार येथे 90 आणि तुळशी येथे 18 दशलक्ष लिटर पाण्यावर रोज पीएसी म्हणजेच पॉली एल्युमिनियम क्लोराईडची प्रक्रिया करून शुद्ध केले जाते.

- पॉली एल्युमिनियम क्लोराईडची प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी शुद्धीकरण प्रकल्पामध्ये आणले जाते. याठिकाणी सूक्ष्म शारीरिक अडथळा निर्माण करणाऱ्या जंतू आणि कणांवर रासायनिक आणि जैविक प्रक्रिया करून पाण्याचे दूषितकरण कमी करून अशुद्धता दूर केली जाते. या वेळी पाण्यावर क्लोरिन डोस देऊन पाण्याचे निर्जंतुकीकरण केले जाते.

- शुद्धीकरण प्रकल्पातून आलेले पाणी हे शहरातील वेगवेगळ्या जलकुंभांमध्ये साठवले जाते. जलकुंभांमध्ये  पाण्यावर बूस्टर क्लोरिन डोसची प्रक्रिया करून पाण्याचे पुन्हा एकदा निर्जंतुकीकरण केले जाते. यानंतर इथूनच थेट मुंबईकरांच्या दारापर्यंत शुद्ध आणि स्वच्छ पाणी पोहोचते.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The purest drinking water in Mumbai