सावधान ! ठाण्याच्या शहरी भागात अधिक धोका, जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 700 पार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर आणि नवी मुंबई या चार प्रमुख महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाच धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर आणि नवी मुंबई या चार प्रमुख महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाच धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे शहरात सोमवारी (ता. 27) 17 नवीन रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर, नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात 15, कल्याण –डोंबिवलीत 8, उल्हासनगर पालिका क्षेत्रात 1 तर, बदलापूरमध्ये 3 अशा 44 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 731 वर पोहोचला असून आतापर्यंत 21 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. 

नक्की वाचा धक्कादायक ! पैसे नसल्याने कोरोना संशयित दोन दिवस उपचाराविना ताटकळत

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनकडून उपाययोजना करून देखील रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान सोमवारी  ठाणे पालिकेच्या हद्दीत 17 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाल्याने शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या 243 वर पोहोचली आहे. तर, मृतांचा आकडा 9 इतका झाला आहे. तसेच कल्याण डोंबिवलीत 8 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून रुग्णांची संख्या 137 वर पोचली आहे. तर, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 15 नव्या रुग्णांमुळे तेथील संख्या 147 इतकी झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे.

नक्की वाचा : मुंबईत धुमाकूळ घालू शकतो कोरोना; १५ तारखेपर्यंत रुग्णांचा आकडा इतक्या जहारांवर जाऊ शकतो

उल्हासनगर पालिका क्षेत्रात एका रुग्णांची नोंद झाल्याने तेथील आकडा 3 वर पोहोचला आहे. तर, बदलापूरमध्ये 3 बाधित नव्या रुग्णांची नोंद झाल्याने तेथील आकडा 20 वर पोहोचला आहे.

Number of Corona positive in Thane district is 731, risk is higher in urban areas


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of Corona positive in Thane district is 731, risk is higher in urban areas