धक्कादायक ! पैसे नसल्याने कोरोना संशयित दोन दिवस उपचाराविना ताटकळत

pen
pen

अलिबाग : कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केल्यावर त्या रुग्णाचा खर्च सरकारने करणे अपेक्षित असताना पेण येथील एका संशयित रुग्णाकडून तपासणीसाठी साडेसहा रुपये मागण्याचा प्रकार घडला आहे. आवश्यक पैसे नसल्याने त्यास दोन दिवस पेण उपजिल्हा रुग्णालयात ताटकळत राहण्याची वेळ आली होती, अखेर पेणमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तचाचणी करण्यासाठी आवश्यक पैशांची व्यवस्था केल्यानंतर या संशयित रुग्णाला पुढील चाचणीसाठी सोमवारी पनवेल येथील कोविड रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

पेण तालुक्यात कोरोना रोगाच्या संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी उंबर्डे येथील रेस्ट हाऊस तसेच सावरसई येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जे.एस.डब्ल्यू.स्टील कंपनीच्या वतीने पेण उपजिल्हा रुग्णालयात पन्नास खाटांचे विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे; मात्र संशयित कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने गरीब संशयित रुग्णांची ससेहोलपट होत असल्याचे दिसून येत आहे. पेण शहरातील देवआळी परिसरात शनिवारी एक रुग्ण कोरोना संशयित म्हणून आढळून आला. या रुग्णाला पेण नगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी व उपजिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांनी पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून घेतले; मात्र या रुग्णाची कोरोनासाठी आवश्यक असणारी स्वॅब चाचणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा रुग्णालयात उपलब्ध नाही.

या संशयित रुग्णास चाचणी करण्यासाठी शासनाने नेमून दिलेल्या रक्त तपासणी केंद्राकडे चाचणी करण्यासाठी साडेसहा हजार रुपये भरण्यास सांगितले; मात्र या रुग्णाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने चाचणीसाठी आवश्यक असणारी रक्कम उपलब्ध नसल्याने शनिवार व रविवार असे दोन दिवस पेण उपजिल्हा रुग्णालयात ताटकळत राहावे लागले. अखेर पेण येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या संशयित रुग्णाच्या चाचणीसाठी आवश्यक असणारी रक्कम सोमवारी जमा केल्यानंतर या रुग्णास पनवेल येथे चाचणी करण्यासाठी पाठवण्यात आले. 

शासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे; मात्र संशयित रुग्णांच्या चाचणीसाठी आवश्यक रक्कम जमा करावी ज्याचा फायदा सर्वसामान्य गरीब रुग्णांना होईल. रुग्णांच्या चाचणीसाठी पैसे लागत असल्याने अनेक रुग्ण हे स्वतःहून पुढे येत नाहीत. गरीब रुग्णांच्या तपासणीसाठी शासनाने मोफत व्यवस्था करावी.
- समीर म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते, पेण 

पेण येथील संशयित रुग्णात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नव्हती; मात्र खात्री करण्यासाठी त्यास पनवेल येथे पाठविण्यात आले आहे. तसेच कोरोनाची शासकीय तपासणी मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालय येथे मोफत होते.
- प्रतिमा पुदलवाड, प्रांताधिकारी, पेण
 

Corona suspects without treatment for two days without treatment

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com