महानगरात फ्लेमिंगोच्या संख्येत 25 टक्क्यांनी वाढ 

flamngo.jpg
flamngo.jpg


मुंबई, ता. 3 : लॉकडाऊनच्या काळात मुंबई महानगरात स्थलांतरीत फ्लेमिंगो पक्षांच्या संख्येत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात सुमारे दीड लाख फ्लेमिंगो संचार असल्याचा दावा पक्षी प्रेमींनी व्यक्त केला आहे. 
मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसासयटीचे फ्लेमिंगो पक्षी अभ्यासक राहुल खोत म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात मागील वर्षापेक्षा 25 टक्क्यांनी फ्लेमिंगोच्या संख्येत वाढ झाल्याचा अंदाज आहे. 
लॉकडाऊनमुळे निसर्गातील मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने फ्लेमिंगोचा मुक्त संचार सुरू आहे. मुंबई महानगरातील प्रदुषण या काळात कमी झाले आहे. त्यामुळे मानवी वस्तीजवळ फ्लेमिंगोचे दर्शन घडत आहे. तसेच मुंबईतील दलदली क्षेत्र (वेटलॅंड) लॉकडाऊनमध्ये सुरक्षित झाली आहेत. त्यामुळे या ठिकाणी फ्लेमिंगो पक्ष्यांना खाद्यही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. 


बीएनएचएससे फ्लेमिंगो अभ्यासक राहुल खोत म्हणले की, लॉकडाऊनमुळे आम्हाला फ्लेमिंगोचे यावर्षी सर्वेक्षण करता आले नाही. पण आम्ही नोंदवलेल्या निरीक्षणावरून लॉकडाऊनच्या काळात 25 टक्के फ्लेमिंगोच्या अधिवासात वाढ झाली आहे. दरवर्षी 1 लाख 25 ते 30 हजार फ्लेमिंगो नोंद होते. या वर्षी ती सुमारे दीड लाखाहून अधिक नोंद होण्याची शक्यता आहे, असे खोत यांनी सांगितले. 
ठाण्याच्या खाडीत व नवी मुंबईत एनआरआय कॉलनीच्या मागील बाजूस टी एस चाणक्य फ्लेमिंगो 3 ते 4 हजार फ्लेमिंगोचे दर्शन होयचे. पण आता त्यांची संख्या आठ ते दहा हजार झाली आहे, अशी माहिती राहूल यांनी दिली. 


अधिवासासाठी पोषक वातावरण
शिवडी, ठाणे खाडी ते जेएनपीटी, उरण पर्यंत फ्लेमिंगो आढळतात. तसेच भांडूप पंपिंग स्टेशनजवळ ही फ्लेमिंगोचे दर्शन झाले. लॉकडाऊनमुळे कंपन्या बंद आहेत. त्यामुळे सांडपाणी समुद्रात सोडले जात नाही. त्यामुळे प्लेमिंगो पक्ष्यांना खाण्यासाठी आवश्यक शेवाळे दलदलतीत व खाडीत या दरम्यान मोठ्या प्रमाणात उगवले आहे. नवी मुंबई व जेएनपीटी येथील दलदलीच्या जागेत बांधकाम सुरू असते. त्यामुळे पक्ष्यांच्या अधिवासामध्ये अडथळे निर्माण होतात. पण लॉकडाऊनमुळे सर्वच काम बंद आहेत. शांतता व मानवी वावर नसल्याने फ्लेमिंगोच्या अधिवासासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

The number of flamingos increased in Mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com