दिलासादायक! इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी; दोन महिन्यांत प्रमाण 'इतके' घसरले

दिलासादायक! इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी;  दोन महिन्यांत प्रमाण 'इतके' घसरले

मुंबई : मुंबईतील कोविड 19 च्या रुग्णांचा आकडा आता हळूहळू कमी होत असुन महाराष्ट्रातल्या एकूण रुग्ण संख्येपैकी मुंबईचे प्रमाण 24.31 टक्के एवढे झाले आहे. एकिकाळी म्हणजेच 12 जून या दिवशी महाराष्ट्राने एक लाखांचा टप्पा पार केला होता त्यावेळेस हे प्रमाण 54.82 टक्के एवढे होते. पण आता त्यात बरीच घट झाली असुन ही मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक बाब आहे.  सध्या ठाणे पुणे हे दोन कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. महाराष्ट्राच्या 5 लाख 3 हजार 84 केसेसपैकी ठाण्यात आताच्या घडीला 20.60 टक्के म्हणजेच 1 लाख 3 हजार 642 तर, पुण्यात 21.86 टक्के 1 लाख 9 हजार 988 एवढे केसेस आहेत. 12 जुन या दिवशी पुण्यात 16 टक्के केसेस होत्या. तर, ठाण्यात 11 टक्के केसेस होत्या.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या म्हणण्यानुसार, पुढच्या दोन आठवड्यात या जिल्ह्यात आणखी रुग्णांची संख्या वाढू शकते आणि त्यानंतर ती संख्या कमी होईल. त्यानंतर मुंबईसारखंच पुणे आणि ठाण्यातील रुग्णांची संख्या कमी होईल. 

मुंबईत गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली आहे. 12 जुलै या दिवशी राज्यात 2 लाख 54 हजार 427 केसेस होते. तेव्हा मुंबईत 36.55 टक्के म्हणजेच 92 हजार 988 केसेस होत्या. त्यानंतर, 18 जुलैला हे प्रमाण आणखी कमी होऊन 33.34 टक्क्यांपर्यंत पोहचले जेव्हा राज्यात 3 लाख 937 रुग्ण होते. 

पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा आकडा ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आणखी कमी होईल. गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ झालेली नाही. झोपडपट्टी परिसरातील रिकव्हरी रेट चांगला आहे. धारावी जिथे जास्त लोकसंख्या असल्याकारणाने चिंतेचा विषय होता. मात्र, आता तिथे ही सरासरी दोन आकडी किंवा एक आकडी असे रुग्ण दररोज सापडत आहे असे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचे म्हणणे आहे. 
मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या ही ठाणे आणि पुण्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येपेक्षा कमी आहे. शनिवारी मुंबईत 19 हजार 914 सक्रिय रुग्ण होते तर ठाण्यात 22 हजार 943 सक्रिय रुग्णांची नोंद केली गेली. दरम्यान, पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्णांची नोंद केली असुन 41 हजार 266 एवढी संख्या होती. 

या दोन्ही शहरांतील चाचण्यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे ही मोठ्या संख्येत रुग्णांची नोंद होत आहे. शिवाय, पुणे आणि ठाणे ही दोन्ही शहरात आता मोठ्या प्रमाणात वर्दळ झाली आहे त्यामुळे ही रुग्ण वाढत आहेत. 

डॉ. प्रदिप आवटे, राज्य सर्व्हेक्षण अधिकारी

------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com