
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची नुकतीच पुर्नरचनना करण्यात आली आहे. या पुनर्रचनेत नव्याने बेलापूर परिमंडळ-३ व रबाळे आणि खारघर या दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांची निर्मिती करण्यात आली. या पुर्नरनेनंतर पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशनचे विभाजन व नव्या पोलीस स्टेशनची निर्मिती करण्याच्या हालचाली पोलीस आयुक्तालयाकडुन सुरु आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आणखी तीन नव्या पोलीस स्टेशनची भर पडणार आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशनची संख्या २५ होणार आहे.