esakal | कोरोना काळात दुरावा! प्रवासी वाढीसाठी एसटी कर्मचाऱ्यांची गाण्यातून साद
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना काळात दुरावा! प्रवासी वाढीसाठी एसटी कर्मचाऱ्यांची गाण्यातून साद

कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मार्च महिन्यापासून टाळेबंदी करण्यात आली. त्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्व प्रकारच्या वाहतुकीलाही ब्रेक लागला. त्याचा फटका राज्यातील एसटी महामंडळाला देखील बसला आहे. या टाळेबंदीच्या काळात दुरावलेल्या प्रवासी वर्गाला पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्न करीत आहे. त्यात आता कामगार वर्गाने देखील या दुरावलेल्या प्रवाशांना गाण्याच्या माध्यमातून साद घालण्यास सुरुवात केली आहे. सध्या समाजमाध्यमावर हे गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कोरोना काळात दुरावा! प्रवासी वाढीसाठी एसटी कर्मचाऱ्यांची गाण्यातून साद

sakal_logo
By
राहुल क्षीरसागर

ठाणे : कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मार्च महिन्यापासून टाळेबंदी करण्यात आली. त्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्व प्रकारच्या वाहतुकीलाही ब्रेक लागला. त्याचा फटका राज्यातील एसटी महामंडळाला देखील बसला आहे. या टाळेबंदीच्या काळात दुरावलेल्या प्रवासी वर्गाला पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्न करीत आहे. त्यात आता कामगार वर्गाने देखील या दुरावलेल्या प्रवाशांना गाण्याच्या माध्यमातून साद घालण्यास सुरुवात केली आहे. सध्या समाजमाध्यमावर हे गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

क्लिक करा : उत्तर प्रदेश पोलिस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करतंय? राज ठाकरे यांचा सवाल

राज्य सरकारने 23 मार्च 2020 पासून राज्यात सर्वसामान्य प्रवाशांसाठी एसटी बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एसटीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. केवळ अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी बससेवा सुरू करण्यात आली. कालांतराने सरकारने कोरोनाबाबत उपाययोजना आणि अटी-शर्तींवर एसटी प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, या काळात एसटी प्रवास योग्य आहे का? योग्य प्रकारे एसटी बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत असले का, असे अनेक प्रश्‍न प्रवाशांमधून उपस्थित होत होते. त्यामुळे कोरोनाच्या या काळात एसटीपासून प्रवासी वर्ग दुरावला गेला. 

एकीकडे महामंडळाकडून प्रवाशांना आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे एसटी कर्मचारी देखील प्रवाशांना गाण्याच्या माध्यमातून साद घालत आहे. "प्रितीचं झुळझूळ पाणी...'या गाण्याच्या चालीवर "एसटीच्या गाडीन जाऊ, सौंदर्य देशाच पाहू, लहान मोठ्यांना, दीन-दुबळ्यांना, सोबत सर्वांना घेऊ', या गाण्याच्या माध्यमातून प्रवाशांना साद घालण्यात येत आहे. याबाबतचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या या आर्त हाकेला प्रवासी साद देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

क्लिक करा : किमान आता तरी चाचण्यांचे प्रमाण वाढवा; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र 

एसटीचे उपाययोजनांबाबत माहितीपट 
लॉकडाऊननंतर राज्यातील व्यवहार हळूहळू सुरळीत होत असताना हा प्रवासी वर्ग पुन्हा एसटीकडे वाळवा, यासाठी महामंडळाच्या वतीने माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या माहितीपटाच्या माध्यमातून एसटी प्रशासनाकडून काय उपाययोजना करण्यात येत आहेत, याची माहिती देण्यात येत आहे. प्रवासाआधी बस स्वच्छ धुऊन त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येते, त्यामुळे आपला प्रवास कसा सुरक्षित आहे, हे माहितीपटाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. हा माहितीपट समाज माध्यमाद्वारे प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात येत असून आतापर्यंत 10 लाख दर्शक (व्हिव्ज) मिळाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. 

------------------
(संपादन : प्रणीत पवार)
 

loading image