Lockdown : 'साहेब, आम्हाला गावी जायचंय'..., आपत्ती व्यवस्थापन कक्षेत फोनचा खणखणाट

migrant
migrant

 ठाणे: 'हमें गाव जाना है, कहा अर्जी करणा पडेगा', 'मला घरी जाण्यासाठी अर्ज कुठे मिळेल?' अशा एक ना अनेक प्रश्नांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातील दूरध्वनी दणाणून गेले होते. नुकतेच राज्य शासनाने अडकेलेल्या मजूर, विद्यार्थी, नागरिक यांना घरी परतण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. त्या संदर्भातील अर्ज व तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात यावे, असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी आणि रविवारी दिवसभरात  जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात सुमारे 600 कॉल्स तर, 900 हून अधिक मेल प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. 

देशातील लॉकडाऊनची मुदत 3 मेव वरुन 17 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, राज्य सरकारने या नागरिकांनाचा आपआपल्या घरी परतण्याचा मार्ग मोकळा केला आहे. टाळेबंदीच्या काळात इतर राज्यात अडलेल्या विद्यार्थी, कामगार आणि मजूरांना त्यात–त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात आले. तसेच त्यात कोणते तपशील द्यायचे आहे याबाबतची माहिती देखील देण्यात आली आहे.

ही बातमी पसरताच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षातील फोन वाजू लागले. तसेच विविध ठिकाणी अडकलेले मजूर, विद्यार्थी यांच्यासह नागरिक आम्हाला आमच्या घरी जायचे आहे. त्यासाठी अर्ज उपलब्ध आहे का? कुठे मिळेल, की ऑनलाईन अजर करण्यासाठी वेबसाईट कोणती, मेल आयडी काय आहे?, असे अनेक प्रश्नांचा भडीमार सुरु झाला. या तक्रारींमध्ये मजुर, विद्यार्थी व नागरिकांची संख्या जास्त दिसून येत आहे.

number of questions in District Disaster Control Room 600 calls in 2 days

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com