esakal | घाटकोपरमध्ये असंख्य वाहने जळून खाक; कोणीतरी जाणीवपूर्वक आग लावल्याचे आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

घाटकोपरमध्ये असंख्य वाहने जळून खाक; कोणीतरी जाणीवपूर्वक आग लावल्याचे आरोप

खंडोबा टेकडी परिसरातील सह्याद्री सोसायटी परिसरात अनेक वाहनांना आग लागल्याची घटना शनिवारी (ता. 26) पहाटे उघडकीस आली.

घाटकोपरमध्ये असंख्य वाहने जळून खाक; कोणीतरी जाणीवपूर्वक आग लावल्याचे आरोप

sakal_logo
By
निलेश मोरे

घाटकोपर ः खंडोबा टेकडी परिसरातील सह्याद्री सोसायटी परिसरात अनेक वाहनांना आग लागल्याची घटना शनिवारी (ता. 26) पहाटे उघडकीस आली. आगीत 13 दुचाकी आणि 2 ऑटोरिक्षा जळून खाक झाल्या आहेत. आग कशामुळे लागली हे अद्याप समोर आले नसून पोलिस पुढील तपास करत आहे. मात्र, ही आग कुणीतरी जाणीवपूर्वक लावल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

पनवेल/एलटीटी ते गोरखपूर विशेष ट्रेन्सचे वेळापत्रक जाहीर; 27 सप्टेंबरपासून IRCTCवर बुकिंग सुरू

घाटकोपरमध्ये खंडोबा टेकडी लोकवस्तीत बैठ्या चाळीची घरे असून तेथील रहिवाशांची वाहने उभी करण्यासाठी एकाच ठिकाणी जागा आहे. ती जागा अंधारमय असल्याने तेथे रात्रीच्यावेळी गर्दुले नशा करत असतात. कदाचित त्यांनीच उभ्या असलेल्या वाहनांना आग लावल्याचा संशय नागरिकांना आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि पोलिस दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top