"OBC समाजाची स्वतंत्र जनगणना करावी", उपसमितीच्या अहवालात आणखी कोणत्या आहेत मागण्या?

सुमित बागुल
Monday, 7 December 2020

OBC समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी महत्त्वाची शिफारस करण्यात आली आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात अंतरिम स्थगिती देण्यात आली. त्यानंतर OBC समाजाच्या उप समितीची देखील स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ हे आहेत. त्यांनी आज एक अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे.

'ऑदर बॅकवॉर्ड क्लास' म्हणजेच ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, अशी महत्त्वाची शिफारस या अहवालामार्फत करण्यात आली आहे. OBC समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने त्याबाबतचा अहवालच उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे. यामध्ये OBC समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी महत्त्वाची शिफारस करण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी : VIDEO :: "बहती गंगा मैं हाथ धोना" हा प्रकार सध्या सुरु आहे : फडणवीस

OBC समाजाकडून मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या अहवालातील प्रमुख शिफारसी 

  • OBC समाजाची स्वतंत्र जनगणना करावी 
  • OBC, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्गाच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी अर्थसंकल्पात पाच हजार कोटींची तरतूद करावी 
  • OBC समाजाच्या विविध संस्थांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. ज्यामध्ये OBC महामंडळासाठी २०० कोटी, तर विविध OBC योजनांसाठी ४०० कोटी रुपयांच्या तरतुदीची मागणी 
  • इंग्रजी नामांकित शाळांमध्ये OBC समाजातील मुलांच्या प्रवेशासाठी विशेष योजना सुरु करावी   
  • OBC पदभरती लवकरात लवकर करावी अशी देखील मागणी या अहवालात करण्यात आलेली आहे.

मुंबईतील  सर्व महत्त्वाच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा । Marathi News From Mumbai

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: OBC committee submits report to CM thackeray and demands separate census